23 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img

नजिकचिंचोली येथील अनेक वर्षापासून बंद शेतरस्ता खुला महसूल अधिकाऱ्यांचा केला सत्कार…

अनेक वर्षापासून बंद शेतरस्ता खुला
महसूल अधिकाऱ्यांचा  सत्कार
भेंडा – दै.नगरशाही वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथील शेतकऱ्याचा 4 – 5 वर्षांपासून बंद असलेला वहिवाटीचा रस्ता बंदोबस्तात खुला केला. समाधानी झालेल्या शेतकऱ्याने नेवासा तहसीलदर सह संबंधितांचा शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्यांसमवेत सत्कार केला.

मंडळअधिकारी स्वाती मनाळ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सोनाली मात्रे यांचा सत्कार करताना मिनीनाथ धाडगे, कारभारी गरड, कानिफनाथ कदम,प्रशांत चौधरी, ज्ञानेश्वर जंगले, रमेश भक्त

नजीक चिंचोली येथील मिनिनाथ गोरक्षनाथ धाडगे यांच्या गट क्रमांक 131 साठी अनेक वर्षापासून असणारा वहिवाटीचा रस्ता गट 132 व 133/1 च्या शेतकऱ्यांनी 5 वर्षांपासून बंद केला होता. त्यामुळे शेत मशागतीसाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असत. रस्त्याअभावी काही पिके जळाली व काही वर्ष जमीनही पडीक पडली. तहसीलदार,प्रांत व जिल्हाधिकारी यांचे तीनही निर्णय धाडगे यांच्या बाजूने असूनही रस्ता अडवणारे पुन्हा न्यायालयात स्थगिती आदेशासाठी गेले होते. मात्र तेथेही धाडगे यांच्या बाजूने निर्णय झाल्याने अखेर तहसीलदारांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यात आला.


उपनिरीक्षक शिवाजी आंधळे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे रस्ता डवणाऱ्या शेतकऱ्यांना नमते घ्यावे लागले. या सर्व प्रक्रियेसाठी शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. पावसाळ्यापूर्वी रस्ता खुला करण्यासाठी सहकार्य करणारे तहसीलदार संजय बिरादार, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सोनाली मात्रे,नायब तहसीलदार नामदेव बोरुडे,अव्वल कारकून शिरीष कुलकर्णी, मंडल अधिकारी प्रीती मनाळ, तलाठी कदम भाऊसाहेब आदींचा शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसील कार्यालयात मिनीनाथ धाडगे व कार्यकर्त्यांनी यांनी सत्कार केला.
याप्रसंगी शिवपानंद �

Related Articles

ताज्या बातम्या