22.1 C
New York
Saturday, July 18, 2026

Buy now

spot_img

प्राचार्य सोपानराव काळे यांना राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार

 

नेवासा फाटा प्रतिनिधी – कबड्डी क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे यांना राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त व 26 व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी राज्याचे उद्योग विकास मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्राचार्य काळे यांना सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य सोपान काळे यांनी 1995 मध्ये तेलकुडगाव येथे कबड्डी संघाची स्थापन केली. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात क्रीडा शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवले. कबड्डी बरोबरच खो-खो, कुस्ती, धावणे, आर्चरी, शुटिंग, बॉक्सिंग, हॉलीबॉल या खेळातही त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड सुमती साहेबराव घाडगेपाटील, उपाध्यक्ष ॲड सौ.स्नेहल चव्हाणपाटील, सहसचिव डॉ.श्रुती आमलेपाटील,कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव आमलेपाटील,चेतन चव्हाणपाटील, अधिरथ पवार यांचे सह सर्व विभागप्रमुख,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या