22.1 C
New York
Saturday, July 18, 2026

Buy now

spot_img

जिद्द व निरंतर अभ्यासाने यशप्राप्ती – अँड हिंम्मतसिंह देशमुख

दै नगरशाही नेवासा प्रतिनिधी –
ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द चिकाटी व निरंतर अभ्यास करून यशप्राप्ती करतात, असे प्रतिपादन लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अँड हिंम्मतसिंह देसाई देशमुख यांनी केले.

पीयूष शहाराम अंबाडे या शेतकरी पुत्राने कष्ट ,वेळेचे नियोजन, अभ्यास व
योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा देशपातळीवर आपल्या गुणवत्तेचा डंका वाजवला आहे. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘NEET (UG) – 2026’ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचा विद्यार्थी पीयूष अंबाडे शहाराम याने ७२० पैकी ५६७ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला एकूण ९८.७२ पर्सेंटाईल मिळाले असून, त्याचा ऑल इंडिया रँक (AIR) २५,१२२ आहे. या यशासह त्याचे डॉक्टर (MBBS) होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.

कुकाणा ता. नेवासा येथे त्याचा कावरे पाटील परिवार व कुकाणा येथील हिंम्मतसिंह देशमुख मित्र मंडळ, विविध सामाजिक संघटना, वसंतराव देशमुख फ्रेन्ड सर्कल कुकाणा व युवक मंडळातर्फे पीयूषचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अँड हिंम्मतसिंह देशमुख,सामाजिक कार्यकर्ते तथा कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र कावरे,मा उपसरपंच बाळासाहेब कचरे, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दौलतराव देशमुख,मा उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, दैनिक नगरशाही वृत्तपत्र समूहाचे ईस्माइल शेख,कैलास म्हस्के, गेवराईचे चेअरमन निलेश कर्डिले,पत्रकार समीर शेख, अमोल बरबडे , विकास भेंडेकर, देविदास ओंबळे, शिवाजी कावरे, संजय कावरे, जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कावरे, अंबादास सावंत, जयराम लोंढे,दिपक कावरे, प्रवीण कचरे, यांच्या सह मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या