24.8 C
New York
Friday, July 17, 2026

Buy now

spot_img

ग्रामीण भागातील गुणवत्तेचा देशपातळीवर डंका:* नेवाशाचा सुपुत्र पीयूष शहाराम अंबाडे याचे NEET परीक्षेत दैदिप्यमान यश; ५६७ गुणांसह ‘MBBS’ चे स्वप्न होणार साकार!

*ग्रामीण भागातील गुणवत्तेचा देशपातळीवर डंका:*

नेवासा (प्रतिनिधी):  समीर शेख
कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा देशपातळीवर आपल्या गुणवत्तेचा डंका वाजवला आहे. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘NEET (UG) – 2026’ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचा विद्यार्थी पीयूष अंबाडे शहाराम याने ७२० पैकी ५६७ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला एकूण ९८.७२ पर्सेंटाईल मिळाले असून, त्याचा ऑल इंडिया रँक (AIR) २५,१२२ आहे. या यशासह त्याचे डॉक्टर (MBBS) होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.
*प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण आणि यशाची परंपरा:* पीयूषचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणेदायी राहिला आहे. त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्तापूर येथे झाले. त्यानंतर १० वी पर्यंतचे शिक्षण त्याने चांदा येथे पूर्ण केले, जिथे तो परीक्षा केंद्रात प्रथम आला होता. पुढील १२ वी चे शिक्षण त्याने त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, कै. संत हरीभाऊ आनंदराव घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तेलकूडगाव येथे घेतले. या विद्यालयातही त्याने १२ वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून आपली चमक दाखवली होती. हीच यशाची मालिका त्याने NEET परीक्षेतही कायम ठेवली.

*ग्रामीण भागातील कुटुंबाचे व शिक्षकांचे लाभले मार्गदर्शन:* पीयूषचे आई-वडील हे प्रगतशील शेतकरी आहेत. रस्तापूर (ता.नेवासा) सारख्या ग्रामीण भागात राहूनही पीयूषने हे यश मिळवले. पीयूषला त्याच्या मोठ्या (सोनूदादा) भावाचेही अनमोल मार्गदर्शन लाभले, जो स्वतः कुकाणा विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून आपल्या बॅचमध्ये १० वीत प्रथम आला होता. यासोबतच, त्याचे मामा तथा जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षक शिवाजीराव कावरे सर, आणि त्याचे आजोबा तथा कुकाणा विद्यालय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मच्छिंद्रपाटील कावरे यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन पीयूषला मोलाचे ठरले.
*सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव:* ग्रामीण भागाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेल्याबद्दल पीयूष अंबाडे, त्याचे आई-वडील, आजोबा, मामा आणि त्याला मार्गदर्शक ठरलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या शिक्षकांचेही.. सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

पीयूषच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे कौतुक होत असून, त्याच्या पुढील वैद्यकीय (Medical) प्रवासासाठी
पियुष अंबाडे व कावरे परीवाराचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील,उपाध्यक्षा स्नेहल चव्हाणपाटील, सहसचिव डॉ.श्रुती आमलेपाटील, संस्थेचे विश्वस्त चेतन चव्हाणपाटील, डाॅ.गौरव आमलेपाटील व तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या