29 C
New York
Thursday, July 16, 2026

Buy now

spot_img

चिलेखनवाडीतील जलजीवन ची कामे तातडीने पूर्ण करा : भाऊसाहेब सावंत

कुकाणा : भेंडा – कुकाणा सह इतर चार गावे पाणीपुरवठा योजतेतील चिलेखनवाडी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत .अशी मागणी सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी केली आहे .
केंद्र सरकारने ‘ हर घर जल ‘ हे घोषवाक्य घेऊन देशातील प्रत्येक गावातील कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे ,महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबावी , जलजन्य आजार कमी व्हावेत त्यानुसार प्रति व्यक्ती ५५ लिटर पाणी दरडोई थेट नळाद्वारे कुटुंबाला दारापर्यंत देण्याचे शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते . या योजनेत भेंडा – कुकाणा सह ४ गावे पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व विस्ताराचा समावेश होता . या अंतर्गत चिलेखनवाडी गावासाठी गावठाण व वाड्यावस्त्यासाठी पाणीपुरवठा व नवीन पाणी साठवण टाकी मंजूर झाली होती . परंतु सदर कामे अनेक दिवसापासून बंद आहेत . ५०टक्के कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत .पाडळे वस्ती , शेख वस्ती , गोसावी वस्ती या वस्त्यांपर्यंत वितारिका टाकलेल्या नाहीत . नवीन पाण्याची टाकी , गावअंतर्गत वितरिकांची कामे झालेली नाहीत .सावंत वस्ती कडून वितरिका अर्ध्यावरच आणून सोडली आहे .सामान्य नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची आशा दाखवणारी ही जलजीवन मिशन योजना नागरिकांसाठी आता मृगजळ ठरली आहे . सदर अपूर्ण कामे पूर्ण व्हावीत .म्हणून सरपंच , उपसरपंच यांनी दि ७ / ४ / २०२६ रोजी अमरण उपोषण व ग्रामस्थांचे धरणे आंदोलन केले होते दि . ८ / ४ / २०२६रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे उपविभागीय अभियंता नेवासा यांनी सदर आंदोलन मागे घेण्यासाठी तातडीने काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते . परंतु अद्यापही कामे सुरू झालेली नाहीत . तरी सदर कामे तातडीने सुरू करण्यात यावी अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल . असा इशारा देण्यात आला आहे . निवेदनाच्या प्रती . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर , तहसीलदार नेवासा यांना देण्यात आल्या आहेत .

Related Articles

ताज्या बातम्या