उद्या अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय प्रज्ञापात्र विद्यार्थी, गुणवंत गणित अध्यापक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण
अहिल्यानगर प्रतिनिधी –
उद्या रविवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10:30 वा अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय प्रज्ञापात्र विद्यार्थी, गुणवंत गणित अध्यापक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण आयोजित करण्यात आल्याची माहिती अहिल्यानगर गणित अध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा .नवनाथ घुले यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ . सर्जेराव निमसे सर,मा .कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड तर राज्याध्यक्ष संजयकुमार निक्रड सर, श्रीराम थोरात शिक्षण निरीक्षक अहिल्या नगर व सुनिल पंडित अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ अहिल्यानगर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल,वाडीयापार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर करण्यात आले असून जास्तीत जास्त गणित अध्यापक मंडळ, गणित प्रेमी शिक्षक व जिल्ह्यातील सर्व अध्यापक मंडळी व कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.










