महाअंनिसच्या तीन दिवशीय विस्तारित राज्य कार्यकारीणीच्या बैठकीला प्रारंभ…
अहिल्यानगर/प्रतिनिधी
वैदिक काळापासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आपल्याकडे सुरू झालेले आहे. त्याला वैदिक संस्कृती मधल्या कर्म करणा ऱ्यांनी विरोध निर्माण केला, तो आज ही सूरु असून प्रस्थापित संस्कृतीला विरोध करणाऱ्यांना आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही-देशद्रोही ठरवले जात असल्याचे भाष्य विवेकवादी विचारवंत जगदीश काबरे यांनी केले.
नगर शहरातील बडी साजन मंगल कार्यालयात शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था आयोजित तीन दिवशीय विस्तारित राज्य कार्यकारीणीच्या बैठकीला शुक्रवार दि.५ जून पासून सुरुवात झाली.विवेकवादी लेखक जगदीश काबरे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय बैठकीचा शुभारंभ झाला.
महा.अंनिसचे राज्य निमंत्रित कॉ.बाबा आरगडे(नेवासा), राज्य कार्यवाह अड.रंजना गवांदे(संगमनेर), राज्य अध्यक्ष माधव बावगे (लातूर), राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे (सांगली),राज्य प्रधान सचिव ठकसेन गोराणे (नाशिक),गजेंद्र सुरकार(वर्धा),विनायक सावळे
(शहादा),रूकसाना मुल्ला (लातूर),
विजय परब (मुंबई), राज्य सरचिटणीस शहाजी भोसले (छत्रपती संभाजीनगर), सुधाकर काशीद (सोलापूर),कृष्णात स्वाती (कोल्हापूर),आरती नाईक (पनवेल), उत्तरेश्वर बिराजदार (लातूर),सुरेश बोरसे (धुळे),विलास निंबोरकर (गडचिरोली), प्रकाशन विभाग राज्य कार्यवाह मच्छिंद्रनाथ मुंडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद भारुळे व डॉ.प्रकाश गरुड, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा व देवदत्त साळवे,सोशल मिडिया कार्यवाह सुखदेव फुलारी, कायदे विषयक सल्लागार अड.अभय राजे,
बुवाबाजी संघर्ष सचिव प्रा.शशिकांत गायकवाड,जात पंचायत सचिव
कारभारी गायकवाड,संविधान जागर सचिव दिपक शिरसाठ,विविध उपक्रम विभाग सचिव बी.के.चव्हाण,महिला सहभाग कार्यवाह छाया बंगाळ, निधी संकलन विभाग सचिव प्रा.अशोक गवांदे,जिल्हा कार्यवाह सांस्कृतिक विभाग कार्यवाह मल्हारी खेडकर,
नगर शहराध्यक्ष भारतभूषण भागवत,
शहर कार्याध्यक्ष विनायक ताकपेरे,
नेवासा अध्यक्ष कॉ.अप्पासाहेब वाबळे,
बबनराव धावणे,चिमाजी धनवडे,अनिता सापा आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.काबरे पुढे म्हणाले की,चार्वाकने पारंपारिक धर्म, वेद, आणि कर्मकांड यांना थेट आव्हान दिले. त्यांने पंचइंद्रियांनी जे जे अनुभवले त्यालाच प्रत्यक्ष प्रमाण मानले,म्हणून
चार्वाकचा छळ झाला. सत्ताधारी कितीही प्रबळ असला तरीही आपण प्रश्न विचारायला घाबरू नये,आपण सत्ताधाऱ्यांना तिथे चुकतील तिथे प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि त्याची योग्य ती उत्तरे किंवा त्यांच्या दबाव निर्माण केला पाहिजे आणि अशा प्रकारचा दबाव निर्माण करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एकमेव चळवळ आहे. या चळवळीत काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते जेव्हा काम करतो तेंव्हा आपल्याला सुद्धा अनेक लोक प्रश्न विचारतात त्याची उत्तरे देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चार्वाक समजून घ्यायला हवा.

राज्याध्यक्ष माधव बावगे म्हणाले,
महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात अंनिसचे सगळे कार्यकर्ते हे कर्तव्य भावनेने काम करत आहेत. ग्राउंड लेव्हलवर काम करणारी ही एकमेव संघटना आहे.
या सारख्या नावाच्या आणखी काही संघटना काम करत असतील, आमची कोणाची स्पर्धा नाही. आमची आमच्याशीच स्पर्धा आहे आणि आम्ही ती स्पर्धा कामातून दाखवत असतो. कार्यकर्ते घरातलं काम नंतर करतील, पण अगोदर चळवळीचं काम करतात. म्हणून ही संघटना ही चळवळ अतिशय लोकांच्या ओठावर आहे आणि ते नुसते शब्दांमधून नाहीतर कृतीमधून आहे.
राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यासाठी वाहून घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दिवंगत
कॉम्रेड पी.बी.कडू पाटील, शंकरराव घुले, रामचंद्र विनायक बंगाळ, रामचंद्र तावरे, भाऊसाहेब पाठक, नागेश कुसाळे, बाळासाहेब आगळे, डॉ. मच्छिंद्र वाघ, सुनीता कुसळे, विजया भारुळे या दिवंगत कार्यकर्त्यांची आठवणींना उजाळा दिला.
विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जिल्हा व शहर शाखेने उत्तम नियोजन केल्यामुळे केल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
कॉ.बाबा आरगडे म्हणाले,अहिल्यानगर जिल्हा सत्यशोधकी विचाराचा वारसा आहे, राज्यात सध्या बुवाबाजीचे पीक वाढल्याने चळवळ वाढवण्याची गरज असल्याचे संगीतले.
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी आभार मानले.
दि.५ रोजी सकाळी ९ वाजता नोंदणी, चहा व नाश्ता, संघटनेची गाणी, १०:३० वाजता स्वागत व उद्घाटन झाले.पहिल्या सत्रात ११:३० वाजता राज्य कार्यकारणी कामकाजाचे सादरीकरण झाले. १:३० वाजता दुपारचे भोजन झाले. दुसरे सत्र दुपारी २:३० वाजता सूरु झाले. पुरस्कारार्थी कार्यकर्त्याचे मनोगत व राज्य कार्यकारणी कामकाज सादरीकरण झाले. तिसऱ्या सत्रात सांयकाली ५ वाजता राज्य कार्यकारणी कामकाज सादरीकरण, ६ वाजता जेष्ठ संपादक कुमार केतकर यांचे भारतीय लोकशाही पुढील आव्हाने याविषयावर व्याख्यान झाले. त्यांचे हस्ते वैचारिक सत्र व पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण झाले.चौथे सत्रात रात्री ७:३० ते ८:३० समविचारी साथी संवाद संपन्न झाला.त्यानंतर स्नेहभोजन झाले.
राज्य भरातील ३५० हुन अधिक पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.










