दैनिक नगरशाही अहिल्यानगर प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी एआय, मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी जिज्ञासावृत्ती जोपासावी.स्पर्धेच्या युगात महत्वाकांक्षी बनावे असे आवाहन डॉ सर्जेराव निमसे यांनी केले.तसेच विद्यार्थी यांनी गणित शिक्षकांना विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे द्यावीत असे सुचविले. ते अहिल्यानगर येथील भाऊसाहेब फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल येथे
अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाद्वारे आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञापात्र विद्यार्थी, गुणवंत गणित अध्यापक व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.
व्यासपीठावर अहिल्यानगर शिक्षण निरीक्षक श्रीराम थोरात साहेब मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे व्हा.चेअरमन अप्पासाहेब जगताप यांच्या सह जिल्हा कार्यकारिणी सदस्य होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गणित अध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष संजयकुमार निक्रड यांनी विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होण्यासाठी संघटना वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे व गणित विषय शिक्षक जीव तोडून काम करताना, गणित शिक्षकांनी निष्ठेने काम केल्यास गणित विषयात अनेक विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतील असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणिताचे जिल्हाध्यक्ष नवनाथ घुले यांनी केले तर आभार अध्यापक बाळासाहेब निवडुंगे यांनी मानले.या प्रसंगी अहिल्या नगर गणित अध्यापक संघटनेचे सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.













