33.8 C
New York
Thursday, June 11, 2026

Buy now

spot_img

नेवासा पोलीसांनी पोक्सो गुन्ह्यातील आरोपी गावठी कट्टयासह जेरबंद

नेवासा पोलीसांनी दमदार कामगिरी


 

 

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी:

नेवासा पोलीसांनी पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीस गावठी कट्यासह जेरबंद केले.

जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एका पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीचा तांत्रिक छडा लावत पोलीसांनी त्याला गावठी कट्टा (पिस्तुल) आणि ४ जिवंत काडतुसासह रंगेहात अटक केली आहे.

आदिनाथ गोरख ढगे वय २६ वर्ष रा. खेडले काजळी ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये दिनांक १०/०६/२०२६ रोजीच्या ऑल आऊट ऑपरेशन मोहिमे अंतर्गत पोलीस पथक फरार व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध मोहिम सुरु होती. या दरम्यान नेवासा ठाण्यातील गु.र.नं. ३०९/२०२६ भा.न्या संहिता कलम ७८, ३५२ सह पोक्सो कलम ८, १२ प्रमाणे मधील फरार आरोपी आदिनाथ गोरख ढगे याचा नेवासा पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरु होता

.

आरोपीबाबत तांत्रिक विश्लेषण करात तो सोनई ता. नेवासा येथे असल्याचे खात्रीशीर माहिती समजताच पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक विकास पाटील व पथक यांना तात्काळ सोनई येथे रवाना केले. सोनई येथे आरोपीस पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. माञ पथकाने शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला बेकायदेशीर रित्या बाळगलेला गावठी कट्टा मॅगझीन लोड केलेले ०४ जिवंत राऊंड सह मिळुन आला.

आरोपीकडे सदर अग्निशस्त्राबाबत कोणताही परवाना नसल्याने त्याच्याविरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९८/२०२६ शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.एम. सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरु साहेब शेवगाव उपविभाग, शेवगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ/२६५९ नारायण डमाळे, पोकॉ/२४०१ सुमित करंजकर, पोकॉ/२५९८ अतुल शेळके आणि पोकॉ/९९० परमेश्वर गहाळ यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या