26.6 C
New York
Sunday, July 26, 2026

Buy now

spot_img

महायुतीचे सरकार सर्व सामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध -मा. खा. सुजय विखे

संघर्षातून आमदार होतो,ती व्यक्ती लोकांचे कल्याण करु शकते- मा खा सुजय विखे पाटील
नेवासा शहरातील साफसफाई लवकरच
कुकाण्यात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा

नेवासा प्रतिनिधी/ समीर शेख
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे सरकार सर्व सामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मा. खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.


आजच्या काळात सुशिक्षित लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी जनता पुढाकार घेत आहे ही चांगली बाब आहे, विठ्ठलराव लंघे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला जनतेने आमदारकीची संधी दिली, त्यामुळे लाटेत नाही तर संघर्षातून आमदार जो होतो तोच लोकांचे कल्याण करु शकते.येणार्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या,समाज हितासाठी उपद्रवी ठरणाऱ्यांचा लवकरच साफसफाई करण्यात येऊन नेवासा शहर स्वच्छ होईल त्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. खा .सुजय विखे पाटील यांनी केले.ते पुढे म्हणाले की गुन्हेगारी विरोधात कुणाला तरी आवाज उठवावा लागेल, राजकीय नुकसान झाले तरी चालेल परंतु गुन्हेगारांचे मतदान नको, तत्वांशी तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आरोगय अधिकारी व कर्मचारी यांनी निवासस्थानी राहून जनतेला आरोग्य सेवा पुरवावी असे आवाहन केले.
ते कुकाणा येथे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा येथे लवकरच अद्ययावत एसटी स्टँडचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेसांगितले.आपण जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


मा.आमदार पांडुरंग अभंग यांनी मागील पार्श्वभूमी सांगून, प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासी स्थाने यामुळे कुकाणा गावच्या वैभवात भर पडली असून चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी कुकाणा ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या कडून जे सहकार्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

व्यासपीठावर डॉ.सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,मा.आ . पांडुरंग अभंग,नेवाशाचे नगराध्यक्ष डॉ.करण घुले, अंकुशराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख, सरपंच लताबाई अभंग, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे,युवा नेते अमोल अभंग, राजेंद्र मते, डॉ गणेश आर्ले   अमोल पारखे, अशोक चौधरी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस विलास देशमुख,डॉ बाळासाहेब कोलते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे, डॉ कैलास कानडे , दिनकरराव गर्जे,आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दौलतराव देशमुख , ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आगळे,उपसरपंच सोमनाथ कचरे,मा. उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,मा. उपसरपंच बाळासाहेब कोलते, प्रशांत देशमुख,समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राहुल जावळे,तुकाराम गुंजाळ, मा सरपंच कारभारी गोर्डे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खराडे,रज्जाकशहा ईनामदार, सुभाष चौधरी अँड गणेश निकम,सिद्धार्थ कावरे, अनिल गर्जे,प्रा .शकुर शेख, बाळासाहेब क्षीरसागर, सचिन गोर्डे,  समीर पठाण, मच्छिंद्र कावरे,किरण शिंदे, सुभाष चौधरी, सुरेश कचरे,यांच्या सह कुकाणा परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ भागवत दहिफळे तर सूत्रसंचालन हभप गणेश महाराज चौधरी यांनी केले.आभार डॉ.दिपक डिंबर यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या