कुकाणा प्रतिनिधी:
विठ्ठल विठ्ठल,जय हरी विठ्ठल “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…” आणि “वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा | निसर्ग जपा, समृद्ध महाराष्ट्र घडवा!” या पर्यावरणपूरक संदेशांचा जयघोष करत, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील किड्स लेन्ड पब्लिक स्कूल मध्ये
‘सर्वमंगल सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य वृक्षदिंडी, बालदिंडी आणि पालखी मिरवणूक आज २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:१० वाजता शाळेच्या प्रांगणातून मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.भक्तीमय वातावरणात दिंडीचे प्रस्थानसोहळ्याची सुरुवात “विठ्ठल विठ्ठल.. जय हरी विठ्ठल” च्या जयघोषात झाली. पारंपारिक पोशाखात नटलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या बालदिंडीमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलाच्या अभंगांमुळे संपूर्ण शालेय परिसर भक्तीमय वातावरणाने प्रफुल्लीत झाला होता.
या दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी एकत्रित येत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला,तो प्रसंग या सोहळ्याचे मुख्य विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढत ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाविषयी प्रभावी जनजागृती केली तर या मंगलमयी प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भक्तिगीतांवर पारंपारिक नृत्य केले.
यावेळी शाळेच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. प्राचार्या हिना शेख , यांनी उपस्थित पालकांचे व बाल दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले . कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेच्या शिक्षिका चंद्रकला पेटे, वैष्णवी राऊत, सरोदे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून केले.










