21.6 C
New York
Thursday, July 30, 2026

Buy now

spot_img

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु वंदन सोहळा उत्साहात; गुरु-शिष्य परंपरेचा जागर*

 

*दैनिक नगरशाही ढोरजळगाव* , प्रतिनिधी : शिक्षणमहर्षी आदरणीय साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु वंदन सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे जतन आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात गुरु पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी गुरु महिमा सांगणारी गीते, मनोगते व सांस्कृतिक सादरीकरणातून गुरुंच्या कार्याचा गौरव केला. कु *. वर्षा फटांगरे, कु. डाके अनुष्का व कु. मानवी डिके* यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत गुरुंच्या ऋणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर *मिसाळ सर* यांनी प्रेरणादायी भाषणातून गुरुंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. पुढे *प्राचार्य आशिष भारती सर* यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी ज्ञान, संस्कार, शिस्त आणि गुरुंच्या मार्गदर्शनाचा आदर करून जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन केले.

*कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संकुलाचे मुख्य प्रशासक आदरणीय सचिन रावजी कर्डिले सर* यांनी अध्यक्षीय मनोगतात गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरा मार्गदर्शक असून गुरुंच्या संस्कारातूनच आदर्श नागरिक घडतात, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी फार्मसी महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ. भोईटे सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चोळके सर, डी.एड* . *महाविद्यालयाचे प्राचार्य नवल सर, प्राचार्य संजय बुधवंत, मुख्याध्यापिका श्रीमती संगीता झिंजुर्डे कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख श्रीराम* *बडे, शरद टेमकर सर, विनायक सातपुते सर, अशोक गाढे सर, संदीप सर, संगीता आहेर मॅडम व स्वाती सानप मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली* .

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी कु. *शेख आयशा व कु. पुंड मानसी यांनी केले. आभार प्रदर्शन कु. तुषाका आल्हाट हिने केले.* कार्यक्रमाची सांगता सर्वांनी सामूहिकरित्या ‘पसायदान’ म्हणत करण्यात आली.

गुरुभक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या