21.6 C
New York
Thursday, July 30, 2026

Buy now

spot_img

तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमीत्त मातृ-पितृ पूजन व पालक मेळावा उत्साहात संपन्न*

*तेलकूडगाव येथील घाडगे पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

दै नगरशाही नेवासा प्रतिनिधी/समीर शेख
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘गुरुपौर्णिमा’, व ‘मातृ-पितृ पूजन’ सोहळा आणि पालक मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

“गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु, गुरु देवो महेश्वरा।गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः॥ह्या उक्तिप्रमाणे सुरुवातीला माता सरस्वती आणि गुरुवर्य बाबास्वामींच्या प्रतिमेचे पूजन करुन ध्यान -धारणेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी पब्लिक स्कूल च्या चिमुकल्या बाल सैनिकांनी नृत्याविष्काराने पालक व गुरुंविषयी सद्भावना व्यक्त केली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम.वैशाली उभेदळ व समवेत प्रमुख अतिथी ॲड.सचिन घोडेचोर,सरपंच सतिष काळे,संभाजी घोडे चोर,श्रीकांत घाडगे,दिपक दिपकने, सोपान घोडेचोर, नवनाथ काळे,सौ.ज्योती काळे,सुधाकर माने,विजय गायकवाड, देविदास गायकवाड,संतोष पुरी, सौ.सोनाली काळे , जगन्नाथ सरोदे,संदीप काळे,अप्पासाहेब काळे, दादा म्हस्के, मल्हारी परभणे, भाऊसाहेब घोडेचोर, सोपान घोडेचोर, चांगदेव टकले, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे प्रशासक मनिषा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सर्व उपस्थितांचा यथोचित सन्मान केल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये उच्च संस्कार आणि पालकांप्रती कृतज्ञतेची भावना रुजवण्यासाठी मातृ-पितृ पूजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः सोबत आणलेल्या पूजेच्या साहित्याने आपल्या माता-पित्यांचे मनोभावे पूजन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित अनेक पालक आणि विद्यार्थी भावूक झाले होते. ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि यश व ऋणानुबंध यासारख्या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कौतुकास्पद सोहळ्याला विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी ॲड.सचिन घोडेचोर व सतिष काळे, प्रशासक मनिषा राऊत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील गुरुंचे महत्व अधोरेखित केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कराड तर संचालन रेणुका काळे व जयश्री भांगे यांनी केले.विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे व उपस्थितांचे पालकांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या