*नेवासा येथे अवैध गोमांस व कातडी विक्रीवर पोलिसांचा छापा आरोपींना अटक
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी – या बाबत सविस्तर वृत्त असे की
नेवासा शहरातील नाईकवाडी मोहल्ला येथे अवैधपणे गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर नेवासा पोलिसांनी आज दि. ०३ जून २०२६ रोजी कारवाई केली. या छाप्यात सुमारे २०० किलो गोमांस व कातडीसह एकूण ६८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, नेवासा शहरातील नाईकवाडी मोहल्ला येथे दोन इसम अवैधरित्या गोमांस विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत, पोलीस पथकाने दुपारी १:३० वाजेच्या सुमारास सलीम गणी शेख याच्या घरावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान घरात गोवंशाचे मांस तोडून त्याची विक्री करत असताना गोमास व कातडी मिळून आल्याने दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. १)*जफर बिलाल चौधरी* वय ३५ वर्षे व २)*सलीम गणी शेख* वय ४५ वर्षे, दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला, ता. नेवासा) अशी या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय कारभारी साठे बक्कल नं. १४६७ यांच्या फिर्यादीवरून, दोन्ही आरोपींविरुद्ध *भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम कलम ५, ५(क), ९, ९(अ)* प्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई,
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, स.फो. नागरगोजे, पोहे.का. अजय साठे पो.का. अतुल शेळके, पो.का. नारायण डमाळे, पो.का. श्रीनाथ गवळी, पो.का.सलमान शेख, चालक पो.का. प्रभाकर पडोळे या पथकाने कारवाई केली आहे.










