19.6 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img

आत्मिक समाधान व निरोगी शरीरासाठी योग महत्त्वाचे – ॲड हिंम्मतसिंह देशमुख

योग दिनानिमित्त ॲड हिंम्मतसिंह देशमुख यांचा सत्कार
दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी – आत्मिक समाधान व निरोगी शरीरासाठी योग महत्त्वाचे असल्याने युवकांनी त्याचा अंगिकार करावा असे आवाहन अँड हिंम्मतसिंह देशमुख यांनी केले.
योग पतंजली समितीच्या वतीने आयोजित योग दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.नुकतीच अँड हिंम्मतसिंह देशमुख व अमोल अभंग यांची लोकनेते स्व.मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडे बु.च्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले.

योग धार्मिक भिंतीच्या आत सिमित न राहता जगभर प्रसार होऊन,योग साधनेचे महत्त्व सर्वांना पटले आहे.त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी नित्यनेमाने योग करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पतंजली योग समितीच्या वतीने प्रा.कुलदिप देशमुख, राजेंद्र वर्मा, योगगुरू पांडुरंग बरे ,मा उपसरपंच बाळासाहेब कचरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कृ.उ.बा.समितीचे संचालक सामाजिक कार्यकर्ते विष्णू फासे, पत्रकार सुनिल पंडित, प्रशांत कासार, राजेंद्र देडगावकर,ईस्माइल शेख, राजेंद्र फासे,विजय घुले,राजू मानकेश्वर, सचिन बोरुडे , बरबडे . , नितीन शिरसाठ , श्रीधर कासार , वैशाली देशमुख,डिक्कर शुभांगी, सुनिता देशमुख,सविता म्हस्के,सौ.बत्रा आदि सह ग्रामस्थ, योगगुरू,योगसाधक उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योग गुरू दिगंबर रिंधे‌ तर आभार योगगुरू काका फोलाणे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या