दै.नगरशाही सोनई प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांनी अर्थशास्त्र विषयातील “Management and Utilization of Water Resources: A Case Study of Ahmednagar District (2001–2010)” या संशोधन विषयावर डॉ. कृष्णा विठ्ठल कोकरे यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. या संशोधनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपत्तीचे वैज्ञानिक, आर्थिक आणि शाश्वत व्यवस्थापन याविषयी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली. समाजाला पाण्याच्या सुयोग्य वापराचे मार्गदर्शन मिळाले, तर संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांना भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी एक विश्वासार्ह अभ्याससंदर्भ प्राप्त झाला. त्यामुळे हे संशोधन केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्याही अत्यंत उपयुक्त ठरते. डॉ. कोकरे यांनी हे संशोधन प्रा. डॉ. डिगंबर खरात, मोरेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी डॉ. कोकरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा. डॉ. सुरेश जाधव, प्रा. डॉ. रविंद्र खंदारे, डॉ. सोपान दराडे, डॉ. भीमराज सोनवणे, प्रा. डॉ. चांगदेव कदम, प्रा. डॉ. महेश जंगले, प्रा. सुनिल गर्जे,प्रा. डॉ. योगेश साळवे, प्रा. डॉ. शरद औटी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. कोकरे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. कृष्णा विठ्ठल कोकरे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे.










