योग केवळ शारीरिक व्यायाम पद्धती नसून जीवनशैली आहे. ॲड.सुमती घाडगेपाटील.
दै.नगरशाही नेवासफाटा प्रतिनिधी – योग केवळ शारीरिक व्यायाम पद्धती नसून जीवनशैली आहे. योगामुळे दैनंदिन तणाव, अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवावे, असे प्रतिपादन त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड.सुमती साहेबराव घाडगेपाटील यांनी केले.
21 जून 2026, जगभरात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन “निरोगी वृद्धावस्था” साठी योग या संकल्पनेसह सकाळी ७.३००वा.सामूहिक योग्य अभ्यासाचे आयोजन करण्यात.

या उपक्रमात त्रिमूर्ती प्राथमिक विद्यालय, श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूल, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सुमारे 5000 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी झाले होते. विद्यालयाचे योग प्रशिक्षक विशाल जाधव यांनी आयुष मंत्रालयाने दिलेल्या “कॉमन योग प्रोटोकॉल” नुसार ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन,प्राणायाम, ध्यान इत्यादी योगाचे धडे दिले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे कार्यकारी अधिकारी डॉ.गौरव आमलेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष ॲड. स्नेहल चव्हाणपाटील, श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे,त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य श्रीदेवी नायर, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य दिपाली बाविस्कर, उपप्राचार्य शांतीलाल मेहेत्रे, संजयसिंह चौहान, विभाग प्रमुख जितेंद्र पाटील, बाळासाहेब साबळे, मिलिंद सोनवणे, अशोक कानवडे, संतोष राऊत, संतोष निंबाळकर, अंजली होन, वसतिगृह समन्वयक एकनाथ कापसे, पांडुरंग कांबळे, उमाजी जंगले, संकुल व्यवस्थापक मेजर सुनील पाटील मेजर परमेश्वर कसाळ संभाजी निकाळजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण दळे यांनी केले आभार क्रीडा प्रशिक्षक महादेव काकडे यांनी मानले.










