24.8 C
New York
Tuesday, June 9, 2026

Buy now

spot_img

अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त संगीता मालकर यांचा शिर्डी शिबिरात सत्कार

भेंडा – नगरशाही
मुख्याध्यापिका संगीता मालकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल साऊ एकल महिला समितीच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय शिबिरात सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे 10 हजार रुपये मालकर यांनी साऊ एकल महिला समितीच्या कार्यास प्रदान केले .
महाराष्ट्र शासनाचा महिला व बालकल्याण विभागाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय 2024 /25 चा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या हस्ते सन्मानित करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्याप्रसंगी सकाळचे जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर,मिलिंद साळवे, ज्ञानेश्वर वाकचौरे, कारभारी गरड,प्रतिमा कुलकर्णी, प्रकाश जोंधळे, अशोक कुटे आदीसह साऊ एकल महिला समितीचे राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
संगीता मालकर यांनी कोपरगाव तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करून आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योग व्यवसाय उभे करण्यात मोलाची मदत व सहकार्य कले. महिलांसाठी शिलाई मशीन, शेळ्या वाटप,आरोग्य शिबिरे, कडधान्यांचे वाटप, सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करुन एकल महिलांच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 1 लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप अशी विविध प्रकारची मदत केली जाते. नुकताच NCMC स्मार्ट कार्डचा कॅम्प लावून 150 एकल महिलांना कार्डचे वाटप करण्यात आले .
सन 2022/23 महाराष्ट्र शासनाचा थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार रक्कम 1 लाख 10 हजार रुपये स्वतः न वापरता एकल महिलांना शिवण यंत्र देऊन आत्मनिर्भर केले. तसेच 7 मार्च रोजी त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांचा कार्याचा गौरव करण्यात केला.
याप्रसंगी डॉ.सूर्यप्रकाश गभने,तुषार हांडे,राजेंद्र पाटील,विजय काका जाधव,शबाना शेख,शितल पाटील,झुल्पीकार काझी,नरेंद्र पाटील,अश्विनी अवताडे,ईश्वर पाटील,राजाभाऊ डुकरे, एकनाथ राऊत,देवेंद्र पाटील,प्रणाली शितोळे,दीपक कांबळे,वर्षा वणारे,नलिनी सोनवणे,अश्विनी नवले,अरविंद हमदापूरकर, अनिता कांबळे, वर्षा पगाळे,बबीता धुर्वे,सविता कुलकर्णी,नीता भोंडे,जयराम वाघ, ज्ञानेश्वर हनवते,बाबासाहेब वाघ,प्रणाली शितोळे, यादव बोरगावकर,बंडू आंबटकर आदीसह विविध 28 जिल्ह्यातील साऊ एकल महिला समितीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या