साऊ एकल महिला कार्यकर्ता शिबिर शिर्डीत उत्साहात संपन्न
एकल महिलांचे संघटन व्यापक करण्याचा निर्धार
भेंडा – दै.नगरशाही वृत्तसेवा
राज्यभरातील सुमारे 30 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पाठबळावर व संघटित कार्यशक्तीच्या जोरावर एकल महिला संघटन मजबूत व व्यापक करण्याचा निर्धार साऊ एकल महिला संघटनेचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी सह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शिबिरात व्यक्त केला.
महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यातील साऊ एकल महिला समितीच्या कार्यकर्त्यांचे शिबिर दि.5 व 6 रोजी शिर्डी येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांचे हस्ते व ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार,मालमत्ता हक्क,10 वी नापास महिलांना परीक्षा देण्याची संधी कौशल्य शिक्षण, रेशन कार्ड,विविध योजना,पुनर्विवाह, एकल महिला धोरण, त्यांच्या बालकांचे बालसंगोपन, शिक्षण कौशल्य शिक्षण, प्रशिक्षण व आरोग्य विषयक सोयीसुविधा, कार्यकर्त्यांना कामाच्या सोयीनुसार राज्य व जिल्हास्तरीय विविध समित्या अशा अनेक विषयावर चर्चा व निर्णय झाले.

या शिबिरात उद्योजक विलास शिंदे,वकील – किरण जपे /औताडे , सावित्रीची लेक राखी रासकर , राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त परिचारिका सुजाता तुस्कानो ,अहिल्यानगर बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड,उद्योजक शांताराम आभाळे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात प्रतिमा कुलकर्णी,संगीता मालकर, अशोक कुटे , मिलिंदकुमार साळवे, मुकुंद टंकसाळे, कारभारी गरड,बाळासाहेब जपे, प्रकाश जोंधळे,आप्पासाहेब ढुस,शिवाजी घाडगे, प्रकाश इथापे, प्रथमेश सोनवणे,उज्वला शेळके, तारामती दिवटे,किरण हिवराळे, नीलम डावरे आदीसह , मुंबई,नाशिक,पुणे,धुळे, जळगाव,गडचिरोली, भंडारा,हिंगोली,अकोले,यवतमाळ,वाशीम, धाराशिव,लातूर,नागपूर,कोल्हापूर,संभाजीनगर, परभणी,जालना,नांदेड सह 28 जिल्ह्यातील 95 कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिबिर यशस्वीतेसाठी वैशाली राजगुरू,विभू अभिजित कुलकर्णी,प्रकाश जोंधळे,संगीता मालकर,सुनील पाटील,ज्ञानेश्वर वाकचौरे,शेखर धनवटे,सूर्यवंशी सर ,तानाजी गोंदकर,जयश्री टुपके,अनिता घोलप सोनाली कालेकर,जयश्री झावरे आदींनी परिश्रम घेतले.
भेंडा – राज्यात एकल महिलांचे धोरण करण्यासाठी मसुदा समितीत निवड झाल्याबद्दल हेरंब कुलकर्णी यांचा सत्कार करताना शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, सतीश वैजापूरकर व कार्यकर्ते .










