27.3 C
New York
Saturday, June 27, 2026

Buy now

spot_img

त्रिमूर्तीच्या वेदांतने जिंकली 50 मेडल्स.
शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील यांचे ऑलम्पिक चे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर.

दै.नगरशाही
नेवासा फाटा प्रतिनिधी -दिनांक 16 जून ते 27 जून 2026 या कालावधीत जर्मनी येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू वेदांत वाघमारे याने 50 मीटर 3 P खेळ प्रकारात सांघिक कास्य पदक मिळवून आपल्या गेल्या सात वर्षाच्या कारकिर्दीतील 50 वे मेडल जिंकून विक्रमी कामगिरी केली आहे.

वेदांत नितीन वाघमारे याने आतापर्यंत ०९ आंतरराष्ट्रीय, २५ राष्ट्रीय आणि १६ राज्यस्तरीय मेडल्स जिंकून संस्थेची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे,.
“माझ्या त्रिमूर्तीचा विद्यार्थी ऑलिंपिक मध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकेल” हे शिक्षण महर्षी साहेबराव घाडगेपाटील यांचे स्वप्न होते. वेदांच्या या यशस्वी वाटचालीमुळे ते स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे,अशी भावना त्रिमूर्ती परिवाराने व्यक्त केली.

या यशाबद्दल त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षाॲड. सुमती साहेबराव घाडगेपाटील,उपाध्यक्ष ॲड.स्नेहल चव्हाणपाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमलेपाटील,कार्यकारी अधिकारी डॉ.गौरव आमलेपाटील,विश्वस्त चेतन चव्हाण पाटील,समन्वयका डॉ. अनुराधा गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे, डॉ. बर्गे मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि पुढील कार्य शुभेच्छा दिल्या
वेदांत वाघमारे यास रायफल शूटिंग चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक छबुराव काळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या