26.1 C
New York
Friday, June 26, 2026

Buy now

spot_img

26 जुन सामाजिक न्याय दिन !

26 जुन सामाजिक न्याय दिन !

दै.नगरशाही विशेष प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज जयंती दिन शासनाच्या वतीने २६ जून हा “सामाजिक न्याय दिन ” म्हणून घोषित केलेला आहे. सामाजिक समता प्रस्थापित करू पाहणाऱ्या लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी व्यापक जनहिताचे केलेले विविध कार्य व कायदे.
१) १४ एप्रिल १९०८ कोल्हापूर मध्ये अस्पृश्यासाठी वस्तीगृहाची सुरुवात.
२) ११ जानेवारी १९११ कोल्हापूर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना.
३) २० मे १९११ आर्थिक दुर्बल असलेल्यांना फी माफीचा निर्णय.
४ ) २४ सप्टेंबर १९११ मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांना फी माफ.
५ ) १६ नोव्हेंबर १९१२ फासेपारधी लोकांसाठी घरबांधणी योजनेस मंजुरी.
६) २८ मे १९९३ प्रत्येक गावात शाळा स्थापनेचा निर्णय.
७) जुलै १९९७ विधवा पुनर्विवाह कायदा व विवाह नोंदणी कायदा अंमलबजावणी.
८) ८ सप्टेंबर १९१७ सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा.
९ ) ३० सप्टेंबर १९१७ सक्तीची प्राथमिक शिक्षण मोहीम शुभारंभ.
१०) २२ फेब्रुवारी १९१८ बलुतेदारी पद्धत कायद्याने बंद.
११) २३ फेब्रुवारी १९१८ कोल्हापूर संस्थानात मिश्र किंवा आंतरजातीय विवाहास पाठिंबा.
१२) २६ जुन १९१८ महारांना कामाची सक्ती न करणे व त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याचा जाहीरनामा.
१३) १ ऑगस्ट १९१८ गुन्हेगार जातीच्या लोकांची हजेरी बंद म्हणून राजाज्ञा.
१४) ८ ऑगस्ट १९१८ राज्यातील सरकारी व सर्वसाधारण खात्यात अस्पृश्यांना अग्रक्रम द्यावा म्हणून आदेश.
१५) १० ऑगस्ट १९१८ अस्पृश्य समाजातील बुद्धिमान व कार्यक्षम तलाठी यांना कारकून किंवा अव्वल कारकून म्हणून नेमण्यास राजाज्ञा .
१६) १८ सप्टेंबर १९१८ महार वतन खालसा.
१७) जानेवारी १९१९ अस्पृश्य नोकरांना दयाळूपणे समतेने वागविण्यासाठी राजाज्ञा.
१८) ७ फेब्रुवारी १९१९ हिंदू व जैन यांच्यातील मिश्र विवाहांना कायदेशीर मान्यता.
१९) ३० सप्टेबर १९१९ अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद व सरकारी शाळेत सर्व जाती धर्माच्या मुलांना प्रवेश.
२०) ६ ऑक्टोबर १९१९ शाळेमधून स्पृश्य – अस्पृश्य प्रथा बंद तसेच मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षण.
२१) ८ ऑक्टोबर १९१९ संस्थानातील सर्व सरकारी आणि सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांना खुली, कुणीही अस्पृश्यता पाळू नये म्हणून जाहीरनामा.
२२) १७ जानेवारी १९२० जोगणी, देवदासी प्रथेचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न.
२३ ) ३१ जानेवारी १९२० राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक साप्ताहिकाची सुरुवात.
२४) २२ मार्च १९२० माणगाव येथे दख्खन अस्पृश्य समाज परिषद डॉ.आंबेडकरांचा गौरव.
२५) १७ एप्रिल १९२० अस्पृश्यांसाठी नाशिक येथे वस्तीगृह बांधण्यासाठी शाहू महाराजांच्या हस्ते पायाभरणी.
२६ ) १३,१५ मे १९२० करवीर गॅझेट मध्ये वेठबिगारी बंद केल्याचा कायदा मोडणाऱ्यास जबर शिक्षा करण्याचा आदेश.
२७) ३० मे, १ जुन १९२० नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष.
२८) ७ जुन १९२० महारांना गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त केल्याची राजाज्ञा.
अशाप्रकारे माणसांना माणूस म्हणून वागण्यास,जगण्यास समानता निर्माण करणारे व सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे राजर्षी शाहू महाराज खरे ” लोकराजा ” म्हणून अजरामर राहतील. सामाजिक न्याय दिनी त्यांना विनम्र अभिवादन !

संग्राहक – कारभारी गरड
( सामाजिक कार्यकर्ता )
भेंडा ता.नेवासा 9421554658

 

Related Articles

ताज्या बातम्या