*सोनईत भर पावसात हजारोंची उपस्थिती*.
दै.नगरशाही सोनई प्रतिनिधी –
मुळा सहकारी साखर कारखाना सोनईच्या माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या 18 संचालकांची बिनविरोध निवड झाली असून
करजगावं गट व
महिला मतदार संघ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीची
सहकार पॅनलची प्रचार सभा
सोनई ता .नेवासा येथे बुध दि 24 जुन 2025 रोजी
मुळा कारखान्याचे संस्थापक मा खा यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली
व मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या
प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली
याप्रसंगी बोलतांना मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले
कारखाना कार्यक्षेत्रातील पूर्ण उसाचे गाळप व्हावे यासाठी कारखान्याची गाळप क्षमता 9 हजार टनी केली व कारखान्याचा विस्तार केला.
उसाला चांगला भाव देता यासाठी कारखान्याने पैसे उपलब्ध करून महत्वकांक्षी इथेनॉल प्रकल्प सुरू केला.
कार्यक्षेत्रात कितीही ऊस उपलब्ध झाला तरीही
कुणाचाच ऊस 12 महिन्यापेक्षा जास्त दिवस गळीताशिवाय राहणार नाही.
सर्वसामान्य शेतकरी, सभासद,ऊस उत्पादक यांना केंद्रस्थानी ठेऊन
कारखान्याचा कारभार
सचोटीने केलेला आहे.
मिळालेल्या राजकिय पदाचा उपयोग कारखाना व सभासदांच्या हितासाठीच केला.
मुळा सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँक या माध्यमातून नेहमी शेती व शेतकरी हिताला प्राधान्य दिले.
कारखान्याची क्षमता वाढवताना सहवीज,इथेनॉल प्रकल्प उभे करतांना कर्ज घ्यावे लागले
घेतलेल्या कर्जाचा विनियोग कारखाना उत्पादन वाढीसाठी व शेतकरी शेतकरी हितासाठी केला.
सहकार मोडू पाहणारे फक्त स्वतःच्या राजकिय फायद्यासाठी
मुळा कारखान्याविषयी खोटे नाटे आरोप करतात हे हास्यास्पद आहे.
त्यांना सभासद बांधव मतदानातून निश्चित उत्तर देतील.
भर पावसात हजारोंच्या संख्येने शेतकरी, सभासद ,कार्यकर्ते उपस्थित राहिले याबद्दल
मा मंत्रो शंकरराव गडाख यांनी उपस्थितांचे आभार मानले
व बॅट चिन्हसासमोरील
बटन दाबून
सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलतांना मा खा यशवंतराव गडाख म्हणाले
मोठ्या कष्टाने
50 वर्षांपूर्वी मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.
कारखाना उभारणी करून
शेतकऱ्यांचे जीवन मान उंचवायचे
ही खुणगाठ मनाशी बांधली होती.
कारखाना उभारणी करतांना
जुन्या जाणत्या मंडळींनी नेवासा तालुक्यातील गावा,गावातील ग्रामस्थांनी बंधू,भगिनींनी मोठा विश्वास टाकल्याने कारखाना उभारणी करू शकलो
मुळा कारखान्यामुळे
तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली
कारखाना सुस्थित असल्याने कारखाना शेअर्सची किंमत आज बाजारभावाप्रमाणे चांगली आहे.
मा मंत्री शंकरराव गडाख यांनी
स्वतः लक्ष देऊन
कारखान्याची क्षमता वाढवल्याने
व इतर प्रकल्प उभे केल्याने
मुळा कारखाना शेतकऱ्यांचा
ऊस वेळेत नेऊन त्यांना हक्काचे पैसे देऊ शकतो.
कारखान्याच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचा नेहमी प्रयत्न केला.
जुनी पिढी व तरुणांना सोबत घेऊन शंकरराव कारखाना समर्थपणे पाहत आहेत याचा मनस्वी अभिमान आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा केलेल्या कारखान्याची निवडणूक सभासद व शेतकऱ्यांना हातात घेतली असून सहकार पॅनलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची खूणगाठ मनाशी बांधल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर,ह भ प रामनाथ महाराज पवार,मुळाचे व्हा चेअरमन
कडूबाळ कर्डीले,शिरेगाव सोसायटीचे चेअरमन डॉ रमेश प्रल्हाद जाधव,मा सरपंच रत्नाकर बोर्डे,अश्रूबा सानप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ रामनाथ बडे यांनी केले
याप्रसंगी विविध संस्थाचे पदाधिकारी, मुळाचे सर्व
बिनविरोध संचालक,जेष्ठ सभासद, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भर पावसातही मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलला पाठींबा देण्यासाठी सभासद बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी…
सोनई ता नेवासा सहकार पॅनलच्या प्रचार सभेत बोलतांना मा खा यशवंतराव गडाख,याप्रसंगी उपस्थित मा मंत्री शंकरराव गडाख आदी व उपस्थित सभासद बांधव
*चौकट*
विरोधी उमेदवाराच्या कुटूंबियांचा व ग्रामस्थांचा सहकार पॅनलला जाहीर
पाठींबा.
मा खा यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा कारखाना नेहमीच शेतकरी व
सभासद हिताला प्राधान्य देतो.
होऊ घातलेल्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांना
विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन
शिरेगाव सोसायटीचे चेअरमन
डॉ रमेश प्रल्हाद जाधव यांनी
करताच उपस्थित सभासदांनी टाळ वाजवून साथ दिली.
व शिरेगाव परिसरातुन सहकार पॅनलला मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे सांगितले.










