14.3 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

spot_img

भेंड्यात रमजान ईद उत्साहात, सर्व धर्मीय सहभागी

भेंडा प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद मुस्लिम बांधवांनी सर्व धर्मीय नागरिकांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण देत एकत्रितपणे व एकोप्याने उत्साहात साजरा केला.
भेंडा येथील लांडेवाडी मध्ये असणाऱ्या इदगाह मध्ये नमाज पठण करण्यात आला. यामध्ये अल्पवयीन बालकांचाही सहभाग मोठा होता. रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये मराठा कुणबी,माळी,धनगर, मागासवर्गीय,जोशी आदि सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते.
रमजानच्या कालावधीत सलग दहा दिवस फक्त मस्जिद मध्येच राहून अल्लाची इबादत (प्रार्थना )पूर्ण वेळ समर्पित करण्याच्या भावनेने अफजल पटेल ,बिबनभाई शेख , मेहबूब भाई शेख ,आयुब भाई शेख यांनी पार पडली. त्याबद्दल त्यांचे भेंडा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच नामदेव निकम, कारभारी गरड, अशोकराव मिसाळ, पावलस गोर्डे,डॉ. शिवाजी शिंदे,अजित रसाळ, किशोर मिसाळ,संतोष फुलारी,राजेंद्र चिंधे,सुहास वेताळ,शरद आरगडे, यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या