20.3 C
New York
Tuesday, June 23, 2026

Buy now

spot_img

योग करणे ही काळाची गरज – प्रा.ईस्माइल शेख

माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल सुलतानपूर बु येथे योग दिन उत्साहात साजरा

दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी -महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार 12 वा.आंतरराष्ट्रीय योगदिन माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल सुलतानपूर बु., ता. शेवगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात व तणावपूर्ण जीवनात निरोगी राहण्यासाठी योग करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.ईस्माइल शेख यांनी केले.माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल सुलतानपूर बु येथे योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे होते.
यावेळी चिमुकल्या बालकांनी योगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले.

 

शेवगावच्या गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ व केंद्र प्रमुख शंकर भोईटे ,मुख्याध्यापिका हीना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका निशा राजळे यांनी विद्यार्थ्यांना योगासने आणि प्राणायाम याविषयी मार्गदर्शन करून प्रास्ताविक सादर केले .

यावेळी राजेंद्र पवार,सोमनाथ राजळे, गणेश पाचगुडे, दादासाहेब साबळे,अनिल लिपणे, अजय गुंड, विजय गुंजाळ यांच्या सह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.आभार उपप्राचार्य आफरिन शेख यांनी मानले.

 

Related Articles

ताज्या बातम्या