दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी –
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की दिनांक 22/06/2026 रोजी सायं 17/10 वा.चे सुमारास नेवासा पो स्टे गुरन /2026 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे शुभम ज्ञानदेव चौघुले वय 27 रा. पिचडगाव ता नेवासा जि अहिल्यानगर याचे राहते घरी एक स्टील ची तलवार अंदाजे 27 इंच लांबीची गोलाकार पितळी मुठ अंदाजे 7 इंच अदाजे किंमत 3000/- आरोपी याचे राहते घरी मिळुन आल्याने सदर घटने बाबत पो .काँ. ज्ञानेश्वर सुदामदेव रसाळ नेमणूक नेवासा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन साहेब मा. अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब वैभव कुलुबर्मे साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु शेवगाव विभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचना प्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे , उपपोलीस निरीक्षक विकास पाटील, पो.हे.काँ. 2129 एस. डी. राठोड पोहेकाँ 973 बी. बी .काळोखे पोकाँ 967 डी. एस. रसाळ पो काँ 2814 एस. व्ही .राठोड पोकाँ 672 ए. एस .शेख अश्यांनी कारवाई केली असुन पुढील तपास पोहेकाँ 973 बी. बी .काळोखे नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहे.










