*सत्तेसाठी नव्हे तर*
*सोनईत शेतकरी मेळाव्यास हजारोंची उपस्थिती*.
दै.नगरशाही सोनई प्रतिनिधी.
सोनई ता नेवासा येथे
शुक्रवार दि .29 मे 2026 रोजी
माजी मंत्री शंकरराव गडाख
यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी नेवासा तालुक्यातील विविध गावामधील हजारो शेतकरी, कार्यकर्ते,पदाधिकारी, तरुण जेष्ठ
यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी केले.
याप्रसंगी बोलताना
नानासाहेब तुवर म्हणाले मुळा सह ,साखर कारखाना शेतकऱ्यांची कामधेनु आहे मा खा यशवंतराव गडाख व मा मंत्री शंकरराव गडाख यांनी ही संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली वाढवली
सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले.
मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसा
यामुळे नेवासा तालुक्याच्या विकासाला गती मिळाली.
फक्त विरोधाला विरोध करून
चांगल्या चाललेल्या
संस्थेत विरोधकांनी राजकारण आणू नये सहकारी साखर कारखानदारी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे.
मा खा यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी माझ्या सारख्या शेतकरी कुटूंबातील व्यक्तीला सलग 11 वर्षे मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहण्याची मोठ्या विश्वासाने संधी दिली.
याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत
कारखाना निवडणूक न लढवण्याचे
जाहीर केले व उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलतांना मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले
मा खा यशवंतराव गडाख यांनी उभी केलेली कामधेनू आपल्या सर्वांच्या
साथीने समर्थपणे चालवत असल्याचा अभिमान असल्याचे शंकरराव गडाख म्हणाले.
नेवासा तालुक्यातील गावा,गावात मुळा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस बेणे, खते,पाईपलाईनसाठी ऍडव्हान्स, बंधारे निर्मिती,ट्रॅक्टर खरेदी,ऊस हार्वेस्टिंग मशीन यासाठी
मदत करून शेतकऱ्यांना
शेती उभे करण्यासाठी मदत केली यामुळे निश्चितच तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली
तालुक्याचा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जनसेवेची वाटचाल सदैव ठेवणार आहे
यासाठी आपल्या सर्वांची साथ
लाभते ,असेही मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले.
गेल्या 5 वर्षांपासून
सहकारी साखर कारखानादारी अनेक अडचणींना सामोरे जात आहे.
मोठया कष्टाने चिकाटीने
काटकसरीने कारभार करून मुळा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या ऊस वेळेत जावा यासाठी कारखान्याचे एक्सपान्शन
केले .
सोनई ता नेवासा येथे आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलतांना मा मंत्री शंकरराव गडाख व उपस्थित जनसमुदाय*…
तसेच
शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देता यावा यासाठी
इथोनॉल निमिर्ती प्रकल्प,वीज निर्मिती प्रकल्प
उभारला
असल्याचे मा मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
सभासद बंधू ,भगिनी यांच्या सहकार्याने व
जेष्ठांच्या आशीर्वादाने
मुळा सहकारी साखर कारखाना
निवडणूक यशस्वी पार पडणार असल्याचा विश्वास माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी
यावेळी व्यक्त केला माझा
लढा सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचे मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले
याप्रसंगी
ऍड सुभाष दरंदले,अश्रूबा सानप,योगेश होंडे,बाळासाहेब पाटील,नवनाथ पठाडे,बाबा घुले,मुकुंद भोगे,अरुण घावटे,जालिंदर येळवंडे,राजेंद्र टेमक
आदींनी आपले मनोगत व्यक्त केले व मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोबत राहून व जनतेच्या कामाशी बांधिलकी जपणाऱ्या
नेतृत्वाला साथ
देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी ह भ प रामनाथ महाराज पवार, ह भ प अवेराज महाराज,विश्वासराव गडाख,मा सभापती अर्थ व पशुसंवर्धन सुनीलराव गडाख,युवा नेते उदयन गडाख,
बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे,मुळाचे व्हा चेअरमन कडूबाळ कर्डीले,दत्तात्रय काळे,तुकाराम शेंडे ,बाजीराव मुंगसे,बाप्पूसाहेब शेटे,भाऊसाहेब मोटे,रामभाऊ जगताप,कारभारी जावळे,अजित मुरकुटे, कैलास झगरे,प्रभाकर कोलते,काकासाहेब शिंदे,नानाभाऊ नवथर,श्रीरंग हारदे,अशोक हारदे,नानासाहेब रेपाळे,भाऊसाहेब लांडे,ऍड आण्णासाहेब आंबाडे,अभिजित लुनिया,आण्णासाहेब पटारे,संजय सुखधान,कृष्णा शिंदे,वसंतराव रोटे,बाळासाहेब शिंदे,काकासाहेब गायके, महेश शिंदे, सदाशिव बहीरट,वसंतराव देशमुख,अशोक मंडलिक,मुक्तार शेख,कानिफनाथ येळवंडे,प्रा गणपत चव्हाण,आबासाहेब फाटके,संजय जंगले,दौलत देशमुख,बाळकृष्ण भागवत, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग निपुंगे,जनार्दन पटारे,अभय गुगळे,संजय आहेर,कपूर कर्डीले,दिलीप सरोदे,ज्ञानेश्वर बोरुडे,प्रल्हाद मते,भानाभाऊ चौधरी,ज्ञानेश्वर औताडे,गणेश भोरे, मच्छिंद्र
म्हस्के,भिवाजी आघाव,संदीप डिके,गणेश ढोकणे,भरत काळे,भीमाशंकर वरखडे,निवृत्ती थोपटे,नितीन लहिरे,भगवान काळे
आदीसह विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठया संख्येने उपस्थित होते
डॉ रामनाथ बडे यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी वाढदिवसानिमित्त हजारो
कार्यकर्त्यांनी मा मंत्री शंकरराव गडाख यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या..
चौकट…
शेतकरी मेळाव्यानिमित्त सोनईत
हजारो शेतकऱ्यांची
उपस्थित लाभली होती
जेष्ठांसह तरुणांची
याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

दै.नगरशाही वृत्तपत्र समूह आणि वसंतराव देशमुख फ्रेन्ड सर्कल तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा.शकुर शेख










