15.9 C
New York
Monday, May 11, 2026

Buy now

spot_img

कुकाण्यातील जनतेने विकासाच्या दृष्टीने महायुती सरकार सोबत रहावे-आमदार विठ्ठलराव लंघे पाटील


मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी हेतूने सातत्याने पाठपुरावा सुरू असून, त्या अंतर्गत अनेक कामे पूर्णत्वास येत आहेत..आ.लंघे

दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी/ समीर शेख -कुकाण्याचा विकास साधण्यासाठी जनतेने व युवा,ज्येष्ठ नेत्यांनी महायुती सरकार सोबत रहावे, असे आवाहन नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित कुकाणा तसेच परिसरातील नागरिक, उपस्थित ग्रामस्थांना केले.कुकाण्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व कुकाणा ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी त्यांनी प्रस्तावित पोलीस स्टेशन,कुकाणा ग्रामिण रुग्णालय व बीड परळी रेल्वे मार्ग, नियमितपणे वीज पुरवठा,पाटपाणी आदि विषयांवर आपण अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

 

📍 ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम (भूमिपूजन) – २५ लक्ष रु.
📍 दत्तनगर अंतर्गत रस्ता काम (लोकार्पण) – १० लक्ष रु.
📍 नेवासा-शेवगाव रोड ते चौधरी चाळ पेव्हिंग ब्लॉक (लोकार्पण) – १० लक्ष रु.

यावेळी बोलतांना ॲड देसाई देशमुख यांनी गावच्या विकासासाठी आगामी काळात कुकाणेकर महायुती सोबत असून सत्तेत महिलांना सक्षमपणे काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.

माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी स्वतः व स्व.लोकनेते आमदार वकीलराव लंघे विरोधी बाकावर असून देखील विकासकामे केली.परंतू आता मात्र आमदार विठ्ठलराव लंघे महायुती सत्तेतील आमदार असून नेवासा विधानसभा मतदारसंघ संघाकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊन,कुकाण्याला जास्त निधी मिळावा अशी मागणी केली.

यावेळी काशिनाथ नवले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास प्रामुख्याने माजी आमदार श्री. पांडुरंग अभंग साहेब, श्री.देसाई आबा देशमुख, नगराध्यक्ष डॉ.श्री.करणसिंह घुले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय लखवाल साहेब, भाऊसाहेब मामा वाघ, दत्तात्रय खाटीक, नेवासा कृ.बा.समितीचे संचालक दौलतराव देशमुख,अशोक दादा मिसाळ,अभीजीत लुणिया,तुकाराम मिसाळ, समता पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल अभंग अंकुशराव काळे, नगरसेवक अंकुश म्हस्के, नगरसेवक अनिल पवार,मा.उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे बबनराव पिसोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, मा सरपंच एकनाथ कावरे,सरपंच सौ. लताताई अभंग, उपसरपंच शुभांगीताई कचरे, ग्रामपंचायत सदस्या हकिमा शेख, रज्जाकशहा ईनामदार, ॲड गणेश निकम,अशोक शेठ चौधरी, मा सरपंच मच्छिंद्र भोसले, मा.सरपंच कारभारी गोर्डे,सुनील वाघमारे, एकनाथ कावरे, मच्छिंद्र कावरे , सुनिल गोर्डे ,गव्हाणे टेलर, अण्णा गर्जे, मच्छिंद्र मुंगसे, राजू काका मते , डॉ.श्री बाळासाहेब कोलते, मंडळ अधिकारी स्वाती साळवे मॅडम, ग्रामसेवक बाळासाहेब आगळे भाऊसाहेब, किरण शिंदे, इब्राहिम सय्यद,कुलदीप देशमुख,बाळासाहेब कचरे,बाळासाहेब क्षीरसागर, बंडू शिंदे , ईन्नुसभाई नालबंद, उमेश सदावर्ते,राजेंद्र खराडे, शकुर शेख, समीर पठाण, कैलास म्हस्के पत्रकार सुनिल पंडित,पत्रकार बाळासाहेब सरोदे, पत्रकार अनिल गर्जे,संजय भंडारी, आत्माराम लोंढे,सचिन गोर्डे,सुरेश कचरे,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते अमोल अभंग तर आभार पत्रकार सोमनाथ कचरे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या