25.5 C
New York
Saturday, June 27, 2026

Buy now

spot_img

तेलकूडगाव येथील जळीत प्रकरणी कुटुंबाला त्रिमूर्ती कडून मदतीचा हात

तेलकूडगाव येथील जळीत प्रकरणी कुटुंबाला त्रिमूर्ती कडून मदतीचा हात

प्रतिनिधी: समीर शेख

अहिल्यानगर मधील तेलकुडगाव (ता.नेवासा)येथील हरिश्चंद्र उर्फ लहानू अशोक सरोदे यांचे घर पूर्णपुणे आगीत जळाले.आज त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण घाडगे पाटील यांनी कुटुंबासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक स्वरूपात व दैनंदिन संसारोपयोगी जीवनाश्यक वस्तू तसेच शालेय साहित्य देत सरोदे कुटुंबाला आधार दिला.
आद. स्नेहल दीदीनीं सरोदे कुटुंबियांना मानसिक आणी आर्थिक भक्कम आधार देत सर्व कुटुंबियांचे सांत्वन करताना पाहून उपस्थितांना व सरोदे कुटुंबियांना आद.साहेबांच्या दानशूर वृत्तीची आठवण झाली.
या कठीण प्रसंगी सरोदे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे त्रिमूर्ती परीवार व ग्रामस्थ उभे राहिल्यामुळे सरोदे कुटुंबियांचेही डोळे भरून आले होते.
यावेळी समवेत प्राचार्य सोपान काळे,प्रशासक मनिषा राऊत,नामदेव अण्णा घोडेचोर,दिपक काळे, संभाजी घोडेचोर,रायभान घोडेचोर, माणिकअण्णा घोडेचोर,बंडू घोडेचोर,भुजंगराव नरोडे, थोरात भारती,संतोष सरोदे,कारभारी घोडेचोर,भाऊसाहेब काळे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या