*एसआईआर प्रक्रिया पारदर्शीपणे राबवा*
(नेवासा प्रतिनिधी ) :
मतदार दुरुस्तीसाठी राबवलेली एसआईआर प्रक्रिया पारदर्शी पार पडण्याची मागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने नेवासा तहसीलदार यांच्याकडे केली.
देशभरात नुकतीच मतदार यादी दुरुस्तीसाठी एसआईआर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचे दिसत असून जाणूनबुजून काही समाजाचे नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा घाट घातल्याचे दिसून येत असून याबाबत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने आक्षेप नोंदवला आहे. नेवासा तालुक्यात ही प्रकिया पारदर्शी राबावी यासाठी आज तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन मतदार यादी दुरुस्ती संदर्भात काही मागण्या करण्यात आल्या. मागण्यात प्रामुख्याने
मतदार यादीतून ज्या व्यक्तीची नावे वगळणार त्याचे आधार, मतदान कार्ड व इतर रहिवासी पुराव्याची योग्य पडताळणी करावी,वगळलेल्या व्यक्तीस नाव वगळल्याचे स्पष्ट व लेखी कारण देण्यात यावे.ते व्हाट्सपद्वारे देता कामा नये,वगळलेल्या नावाची त्या गावातील ग्रामपंचायतला देण्यात यावी. वगळलेल्या नावाचा विषय हा ग्रामसभेत उपस्थित करण्यात यावा.सद्य स्थितीतील मतदार यादीत अनेक व्यक्तीची नावे दुबार, तीन वेळा आली आहेत ती दुरुस्ती करण्यात येऊन त्या व्यक्तीचे नाव एकदाच आले पाहिजे.सद्य मतदार यादीत घर क्रमांक चुकीचे टाकण्यात आले आहे ते दुरुस्ती करण्यात यावे व घराचा खरा नंबर यादीत टाकण्यात यावा. कारण एकाच घरात दहा ते बारा हजार मतदान दाखविण्यात आले आहे.मतदार यादीत मतदाराचे नाव पूर्ण असावे, तसेच त्याच्या वडिलांचे नाव देखील पूर्ण असावे, नविन मतदार यादीत समाविष्ट करताना गावात कोणीही वंचित राहणार नाही याची दाखल घ्यावी तसेच नवीन मतदाराची पूर्ण पुराव्याची शहानिशा करावी.अनेक व्यक्तीची नावे राहत्या गावाऐवजी इतर गावात गेली ती दुरुस्ती करण्यात यावी.
अशा सुधारणा या एसआईआर प्रक्रिया राबविताना व मतदार यादी सुधारणा करण्याबाबत सुचवील्या आहेत. यावेळी वंचितचे पोपटराव सरोदे यांनी
एसआईआर प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची चूक झाल्यास निवडणूक अधीकाऱ्यास जबाबदार धरण्यात येऊन याविरोधातकठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी एसआईआर प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया समजल्या जाणाऱ्या मतदाराच्या अधिकाराची प्रक्रिया आहे. त्यामुळे जनतेने याबाबत अंत्यन्त सजग राहणे गरजेचे आहे. एसआईआर पारदर्शी पार पाडण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. निवेदनावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल,वंचितचे उपाध्यक्ष संदीप क्षीरसागर, महासचिव गणपत मोरे, युवा नेते हरीश चक्रनारायण आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.










