27.3 C
New York
Saturday, June 27, 2026

Buy now

spot_img

दौलतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साईदिप संस्था व दै.नगरशाही,तर्फे शालेय साहित्य वाटप –

विविध सामाजिक संघटना व मित्रमंडळाकडून दौलतराव देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
कुकाणा प्रतिनिधी – कुकाण्याचे मा.सरपंच तथा नेवासा कृ.उ.बा.समितीचे संचालक दौलतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुकाणा येथील विविध परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना दै.नगरशाही वृत्तपत्र समूह व वसंतराव देशमुख फ्रेन्ड सर्कल ,साईदिप ग्रामविकास संस्था तर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुनिल पंडित होते.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुनिल गोर्डे,दै.नगरशाहीचे मुख्य संपादक अँड ईस्माइल शेख,जाकिर शहा होते.

पत्रकार सुनिल पंडित उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना

यावेळी मिशन आरंभ व लक्षवेधक दुहेरी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या मल्हार पंजाबराव देशमुख, ईश्वरी सुरेश कचरे, महिमा दिपक चाबुकस्वार, प्रिन्सेस संदिप चाबुकस्वार, यांना पेन्सिल सेट,कंपासपेटी, वह्या,बुके देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच मिशन आरंभ मध्ये यश मिळवलेल्या युवराज रमेश राऊत,अनम राजू शेख,राजीवर सचिन देवढे यांचाही सत्कार करण्यात आला.किड्स लेण्ड पब्लिक स्कूल कुकाणा येथील विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब डाके, श्रीमती सारिका हराळे, श्रीमती विजया साठे, आदि उपस्थित होते.प्रास्ताविक सतिशकुमार चाबुकस्वार यांनी केले तर
वर्गशिक्षक रमेश राऊत यांनी आभार मानले.

दौलतराव देशमुख यांचा सन्मान करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख, अनिल गर्जे सर,हनुमान पवार, इम्रान शेख,सिद्धांत दूधाचे अशोक दरवडे,शाकीर शेख, गणेश पवार

मा उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, बाळासाहेब कचरे, मच्छिंद्र कावरे, कैलास म्हस्के दौलतराव देशमुख यांचा सन्मान करतांना

अमोल कावरे, सावंत पाटील, विकास भेंडेकर, शिवाजी कावरे सर दौलतराव देशमुख यांचा सन्मान करतांना
राजूशेठ वर्मा, उपसरपंच सोमनाथ कचरे,भिमा विधाटे आदी दौलतराव देशमुख यांचा सन्मान करतांना

Related Articles

ताज्या बातम्या