22.7 C
New York
Saturday, August 1, 2026

Buy now

spot_img

अण्णाभाऊंनी शोषणाविरुद्ध लेखणीला शस्त्र बनविले – लेखक भाऊसाहेब सावंत

कुकाणा प्रतिनिधी : (वार्ताहर ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी , शेतकरी , कामगार , वंचित , उपेक्षित , आदिवासी यांना केंद्रस्थानी ठेवून शाहिरी व साहित्य निर्माण केले . त्यांचे विचार समतावादी व जात – वर्ग संघर्ष यावर आधारित होते . त्यांनी शोषणाविरुद्ध लेखणीला शस्त्र बनवले . असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत यांनी केले .


तरवडी ता . नेवासा येथील विराट सामाजिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .प्रा.डॉ . संजय दरवडे हे अध्यक्षस्थानी होते .

श्री सावंत पुढे म्हणाले की , अ आण्णाभाऊ प्रतिभावंत साहित्यिक होते . त्यांचे शिक्षण कमी होते पण वैचारिक जाण प्रचंड होती . माणसाला अन्यायविरुद्ध बंडखोर बनवणे .अन्यायाला प्रतिकार करणारा माणूस घडविणे हे त्यांच्या साहित्याचे उद्दीष्ट होते . त्याकाळी त्यांनी जे प्रश्न मांडले ते आजही सुटले नाहीत . महान लेखकाला व्यवस्थेने जातीत बंदिस्त केले . सर्वांनी त्यांच्या क्रांतिकारी लेखनातून प्रेरणा घ्यावी . कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक सायमन भारस्कर यांनी केले . कार्यक्रमास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमोल अभंग ,मा . सरपंच बाबासाहेब घुले , अजित पाटील , यशवंत पाटील ,कारभारी तुपे , वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपट सरोदे , रामनाथ सातपुते , दत्तात्रय भारस्कर ,सचिन क्षिरसागर , रामनाथ सातपुते , शिवाजी महाशिकारे ,सुरेश थोरात ,जालिंदर तुपे , दत्तात्रय भारस्कर , दादासाहेब गवळी , रंगनाथ सातपुते इ .उपस्थित होते .


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मायकल भारस्कर ,किशोर भारस्कर , नंदकुमार भारस्कर , शंकर भारस्कर ,शंकर उमाप , लखन भारस्कर , ज्ञानेश्वर भारस्कर , गोविंद भारस्कर , मंगेश साळवे , मंगेश भारस्कर , रावसाहेब भारस्कर , नानासाहेब भारस्कर ,दत्तात्रय भारस्कर , अभिषेक उमप , विशाल उमाप , दिनेश भारस्कर , बंडू बोरुडे ,सागर भारस्कर , सतीश उमप ,संतोष भारस्कर , गणेश दिनकर , राहूल भारस्कर , बाबासाहेब भारस्कर ,प्रवीण भारस्कर , आदिनाथ भारस्कर , आण्णा भारस्कर विशाल भारस्कर , भाऊसाहेब भारस्कर , नितीन भारस्कर यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

ताज्या बातम्या