भारतीय जनसंसदच्या वतीने ढगे व फुलारी यांचा सत्कार
भेंडा – दै. नगरशाही वृतसेवा
कृषी सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे व महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सुखदेव फुलारी यांचा नेवासा तालुका भारतीय जनसंसद व नेवासा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सोमवार दि. २२ रोजी नेवासा नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभास भारतीय जनसंसदचे नेवासा तालुका अध्यक्ष रामराव भदगले, नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,जनसंसद चे तालुका उपाध्यक्ष कारभरी गरड, कल्याणराव मुरूमकर, बाबासाहेब भागवत, नेवासा नगरपंचायतीचे नगरसेवक कृष्णा परदेशी, नगरसेवक संदिप सरकाळे, नगरसेवक महेश लोखंडे, नगरसेवक अंकुश म्हस्के, नगरसेवक अनिल पवार तसेच सागर पवार व अनिकेत ढोकणे पाटिल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ढगे व फुलारी यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. रामराव भदगले, डॉ.करणसिंह घुले, कारभारी गरड,डॉ.अशोकराव ढगे, सुखदेव फुलारी यांनी मनोगत व्यक्त केले.










