24.4 C
New York
Thursday, May 28, 2026

Buy now

spot_img

कुकाण्यात शासनाच्या नियमांचे पालन करत बकरीईद (ईद-उल-अजहा ) उत्साहात साजरी , गोवंश “गाय राष्ट्रीय पशू “म्हणून घोषित करण्यात यावे -मुस्लिम समाजाची एकमुखी मागणी

बकरीईद (ईद-उल-अजहा ) उत्साहात साजरी

कुकाणा प्रतिनिधी/समीर शेख- एकमेकांच्या धार्माविषयी आदरभाव ठेवत बकरीद ईद साधेपणाने सामाजिक सलोखा जपत साजरी करण्यात यावी असे आवाहन प्रशासनाने केले होते.त्यास नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मुस्लिम समाजातील सर्वानी गोवंशाचा आदर करत बकराईद साजरी केली.
मौलाना इम्रान शेख यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गोवंश आदर करून गोवंशाची कुर्बानी करू नये, स्वच्छता राखावी, इतरांना त्रास होणार नाही,बकराची कुर्बानी करण्यासाठीचे आवाहन केले.यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी गोवंश “गाय राष्ट्रीय पशू “म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी केली.यावेळी उपस्थित मा.सरपंच एकनाथ कावरे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत,गोवंश “गाय राष्ट्रीय पशू “म्हणून घोषित करण्यात यावे या मुस्लिम समाजाच्या
मागणीला पाठिंबा व्यक्त केला.उत्साहपूर्ण वातावरणात बकरी ईद साजरी करण्यात आली.

 

तसेच बकरी ईद निमित्ताने कुर्बानी प्रसंगी स्वच्छता ठेवावी आपल्या पासून इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शासन नियमांचे पालन करून प्रशासनाला देखील सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
मुस्लिम धर्मगुरू मौलाना शमशाद पठाण, यांनी नमाज अदा केली तर मौलाना इमरान शेख , यांनी खुदबा पठण केले.,

.

बकरी ईदच्या निमित्ताने जामा मस्जिद पंच कमिटी अध्यक्ष प्रा.रज्जाकशहा ईनामदार यांनी स्वागत केले.सामाजिक कार्यकर्ते हमीद नालबंद, पापाभाई शेख, याकुब शेख,कृ.उ.बा.समितीचे सदस्य दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख,अमोल अभंग, बाळासाहेब कचरे, मच्छिंद्र कावरे,सामाजिक कार्यकर्ते मुसाभाई ईनामदार , इन्नुस नालबंद, समीर पठाण, मतीन ईनामदार,इम्रान शेख ,अँड.अजय रिंधे,जावेद शेख, ईकबाल इनामदार, जुम्मा पठाण , इम्रान शेख,पत्रकार सुनिल पंडित, कुलदीप देशमुख, बाळासाहेब गर्जे, नबाब शहा, ,मनसेचे विलास देशमुख, राजेंद्र बागडे, अर्जुन लोंढे,समीर शेख,बाळासाहेब सरोदे,अशोक दरवडे,राजेंद्र राऊत, गुलाब सय्यद,रशिद नालबंद, समीर शहा,जमाल शेख,योगेश वर्मा,अभिजीत लुणिया,कैलास म्हस्के,कारभारी गोर्डे, निसार सय्यद,चाँद शेख,राहुल जावळे, सिकंदर शेख, देविदास आंग्रख, अन्सार इनामदार,मच्छिंद्र भोसले, रसुलभाई ईनामदार,अनिल सुसे,आबुलाल शेख आरिफ तांबोळी,अँड गणेश निकम, सिद्धार्थ कावरे, फिरोज शेख ,र उफ नालबंद, बादशहा तांबोळी,यांनी फेसबुक, व्हाट्सअप द्वारे एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सलिम शहा यांनी प्रास्ताविक तर
प्रा.शकुर शेख यांनी आभार मानले.
नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील.,पोलिस नाईक शहाजी आंधळे,पो.काँ.वाल्मिक वाघ, पो.का.अप्पासाहेब वैद्य, पो.काँ.अमोल डमाळे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

ताज्या बातम्या