स्वर्गीय अजित दादांच्या शिकवणीनुसार गोरगरीब जनतेची सेवा पुन्हा सुरू…अब्दुल भैय्या श
दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनानंतर कोणताही बडेजाव न करता, अत्यंत साध्या आणि छोटेखानी स्वरूपात पुरस्कारार्थी सत्कार समारंभ व लाभार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक गावातील काही प्रतिनिधींना निमंत्रित करून जनतेशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- या प्रसंगी बोलताना अब्दुल भैय्या. स्पष्ट सांगितले —“गोरगरीब जनतेची सेवा हीच खरी स्वर्गीय अजित दादांना श्रद्धांजली ठरेल.”

स्वर्गीय अजित दादांनी आम्हाला दिलेली समाजसेवेची शिकवण, सर्वसामान्य जनतेसाठी लढण्याची प्रेरणा आणि गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ताकद हीच आमच्यासाठी खरी ऊर्जा आहे. यापुढेही कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या सेवेत कायम राहील, हा शब्द मी या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांसमोर दिला.
या भव्य मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा जाहीर सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. आतापर्यंत राज्यस्तरावर तब्बल ११ पुरस्कार प्राप्त केलेल्या माझ्या पत्नी सौ. तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांना रोजगार व स्वयंरोजगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राप्त झालेल्या News18 लोकमत राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल विशेष गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा अभिमान संपूर्ण नेवासा तालुक्याला आहे.
तसेच ज्ञानेश्वरी रवी रींधे हिने फुटबॉलमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून नेवासा तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले, तर पिंपरी शहाली येथील कबड्डी संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गावाचा मान उंचावला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेवासा तालुका यांच्या वतीने या सर्व गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वर्गीय दादांच्या हस्ते मुंबई येथे अविनाश आदिक साहेब व जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अहवालाचे वाटप आज करण्यात आले.
आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मला पुढील जनसेवेच्या लढ्यासाठी नवे बळ दिले. माझ्या सर्व लाडक्या बहिणी, युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि उपस्थित नागरिकांचा मी मनापासून ऋणी आहे. जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी केलेल्या कौतुकाचे शब्द व दादांच्या आठवणी मनाला स्पर्शून गेले. तसेच महिला नेत्या आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांनी —“भैय्या, तुम्ही गोरगरिबांसाठी असेच लढा, बहिण म्हणून कायम तुमच्या पाठीशी उभे राहू”असा दिलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे.
तालुका अध्यक्ष अशोकजी मोरे पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. माझ्या मातोश्री ग्रामपंचायत सदस्या हाजी हकिमाबी शेख, माझी भगिनी गायकवाड ताई व युवक अध्यक्ष अभिराज आरगडे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले गाडे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर :अनिल नाबदे पाटील, सुहास टेमक पाटील, आंबादास गायकवाड, जुम्माभाई पठाण, अण्णासाहेब गव्हाणे पाटील, मकरंद राजहंस,नवथर पाटील, राजूभाई शेख, प्रतीक शेजुळ, रवी पिंपळे, सचिन भाऊ, महेश कचरे, महेश जगताप, भाऊराव,चिंधे पाटील, कमलेश काळे पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










