दै.नगरशाही नेवासा विशेष प्रतिनिधी –
हॉटेल ताज विवांता नवी मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला जिद्द, चिकाटी आणि समाजाप्रती असलेली तळमळ यांच्या बळावर शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या तस्मिया शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘News18 लोकमत’ आणि स्टार्टअप महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात तस्मिया शेख यांना सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते, तसेच मंदार फणसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा नवी मुंबई येथे दिमाखात पार पडला. 
शून्यातून उभी केलेली यशस्वी वाटचाल
तस्मिया शेख यांचा प्रवास हा संघर्षातून यशाकडे नेणारा प्रेरणादायी प्रवास आहे. कोणत्याही मोठ्या आर्थिक किंवा राजकीय वारशाशिवाय, केवळ स्वतःच्या कार्यक्षमतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यवसायासोबत समाजसेवेची सांगड घालत त्यांनी अनेकांसाठी प्रेरणास्थान निर्माण केले आहे. बेरोजगारांसाठी आशेचा किरणआज बेरोजगारी ही गंभीर समस्या असताना, तस्मिया शेख यांनी अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल आता राज्यस्तरावर घेण्यात आली
आहे.
कुकाणा येथे आयोजित भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक युवकांना मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
कुटुंबीयांकडून अभिमान व्यक्त “तस्मियाची आज इतक्या मोठ्या व्यासपीठावर दखल घेतली जात आहे, हा माझ्यासाठी तसेच आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी व नेवासा तालुक्यातील माझ्या माय-बाप जनतेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तिची जिद्द, मेहनत आणि समाजासाठीची तळमळ आज फळाला आली आहे.
अशी भावना तस्मिया यांचे पती राष्ट्रवादीचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी व्यक्त केली. तस्मिया शेख या नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांच्या पत्नी असून ग्रामपंचायत सदस्या हकिमाबी लालाभाई शेख यांच्या सुनबाई आहेत. त्या कायम सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जात असल्याने समाजात त्यांच्याविषयी विशेष आदर व्यक्त केला जातो. माजी आमदार पांडुरंग अभंग , ज्येष्ठ नेते ॲड देसाई देशमुख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी तस्मिया शेख यांचे अभिनंदन करत, नेवासा तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. समाजाचा गौरव वाढवणारे यशहा पुरस्कार केवळ तस्मिया शेख यांचा वैयक्तिक सन्मान नसून, मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाचा गौरव आहे. त्यांच्या या यशामुळे समाजाची मान अभिमानाने उंचावली असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










