दै.नगरशाही कुकाणा (वार्ताहर ) -चिलेखनवाडी येथील ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी ७एप्रिल पासून सूरू असलेले अमरण उपोषण व ग्रामस्थांचे धरणे आंदोलन प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्याने मागे घेण्यात आले .
चिलेखनवाडी ता . नेवासा येथील सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी ग्रामस्थांच्या विविध मागण्या संदर्भात अमरण उपोषण व ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरू केले होते . प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकूलांना गावठाण विस्तार वाढ करून शासकीय जागा उपलब्ध करून दिली जाईल . नवीन रेषणकार्ड धारकांचे रेषनकार्ड ऑनलाईन करून त्यांना धान्य उपलब्ध करून देण्यात येईल . श्रावणबाळ , इंदिरागांधी वृद्धापकाळ योजना , संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित लाभार्थीना अनुदान मिळण्यासाठी त्यांचे बंद पडलेले अनुदान गावातच कॅम्प आयोजिन करून त्रुटी दुरु करण्यात येतील .असे तहसील कार्यालयाकडून लेखी अश्वासन देण्यात आले .
शासकीय जागा उपलब्ध होईपर्यंत मंजूर घरकुले रद्द होणार नाही असे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी सांगितले .२२ एप्रिल पासून शिवरस्ते मोजणी करून खुले करण्यात येतील . असे भूमिअभिलेख विभागाने लेखी अश्वासन दिले .
चिलेखनवाडी बस थांब्यावर नेवासा डेपोच्या सर्व एस .टी .बस थांबतील असे डेपो मॅनेजर यांनी सांगितले . जलजीवन मिशनची बंद पडलेली कामे सूरू करण्यात येतील . अशा सर्व मागण्या मान्य झाल्याने नायब तहसिलदार श्री . संदिप चिंतामणी यांनी सरपंच भाऊसाहेब सावंत यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडविले यावेळी नेवासा तालुका लोकसेवक सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद आरगडे शिवपानंद रस्ते चळवळीचे नाथाभाऊ शिंदे , राजेंद्र गरड , बाळासाहेब थोरात , उपसरपंच नाथा गुंजाळ , देविदास सावंत , भाऊसाहेब सावंत , सुहास गायकवाड ,रमेश सावंत , रामदास कांबळे ,संजय गुंजाळ , बाळासाहेब सावंत , शेषराव भातंबरे , , शब्बीर इनामदार , सुरेश कांबळे , विकास कांबळे , रामदास कांबळे , चंद्रकांत पाडळे , प्रभाकर खंडागळे , गुलाबराव गायकवाड , अनिल दुकळे , सुनील गायकवाड , गौरव कांबळे , नवनाथ लोंखडे , अरुण सावंत ‘ लक्ष्मण लोखंडे सुनील दळवी , पांडुरंग मुरकुटे पांडुरंग सावंत रंगनाथ भातंबरे आदिं सह ग्रामस्थ उपस्थित होते .










