मा. आमदार पांडुरंग अभंग यांच्याकडून
सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याचे आवाहन
नेवासा प्रतिनिधी/सुनिल पंडित
आपले जीवन रडत
रडत जगायचे की हसत जगायचे हे योगा शिकवते, आपल्याला विविध व्याधी होऊ नये, असणाऱ्या व्याधी बन्या होण्यासाठी व शरिराची, मनाच्या शुद्धीकरणा साठी योगा प्राणायमाची अत्यंत गरज आहे असे तसेच सामाजिक स्वास्थ्य देखील चांगले रहाते प्रतिपादन माजी आमदार तथा ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील निःशुल्क दैनिक योग प्राणायम पतंजली योग समितीच्या वतीने श्रीराम नवमीच्या शुभमहुर्तावर आयुर्वेदिक कांश्य थाळी मसाज थेरपीच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते आयुर्वेदिक कांश्य थाळीचे पूजन केले व माजी सरपंच एकनाथराव कावरे, दौलतराव देशमुख , माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते विलासराव देशमुख, ज्येष्ठ शिक्षक नामदेव उंडे, सुभाष शिरसाठ, एकनाथ साबळे, कारभारी रिंधे, अनिल गर्जे व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक योगगुरू पांडुरंग बरे यांनी केले. तर श्रीधर कासार यांनी आयुर्वेदिक
कांश्य थाळी मसाज थेरपीचे महत्व विशद केले. श्री. अभंग पुढे म्हणाले की, अनेक माणसे विविध आजाराने त्रस्त झालेले आहेत.
औषधानेही फरक पडत नाही परंतु योग्य व नियमित आहार व्यायाम आणि योगा व प्राणायम केल्यास माणसाचे स्वास्थ्य चांगले
आयुवेदात कांस्य थाळी महत्त्वाचे स्थान आहे.
निःशूल्क बेंनिक योग प्राणायाम केल्याने शरीर
निरोगी रहाते. आणि शारिर सुदृद्ध बनते. या योग समितीने आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक कांश्य घा
थाळी फुट मजाज थेरपी सेवा निःशुल्क सुरू केली हे कौतुकास्पद आहे यावेळी योग समितीचे जिल्हा प्रभारी व योग गुरु दिंगबर रिथे, ज्येष्ठ शिक्षक नामदेव उडे त्यांनी मनोगत व्यक्त केले. कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्तीस पात्र (एनएमएमएस) विद्यार्थ्यां व पालकांचा प्राणायम पतंजली योग समितीच्या वतीने पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्राणायम पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी तथा कुकाणा योग कक्षेचे योग गुरु काकासाहेब फोलाणे, राजेंद्र देडगावकर, प्रशांत बागडे, विष्णू फासे, राजेंद्र वर्मा, प्रा. राजेंद्र फासे,प्रा.कुलदिप देशमुख, सचिन बोरुडे,शुभांगी डिक्कर,जेऊरच्या पोलिस पाटील मिनाताई रिंधे, वैशाली देशमुख यांच्या सह ग्रामस्थ योग कक्षेतील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापक शरद तांबे यांनी केले तर
योग गुरु प्रशांत कासार यांनी नी आभार मानले.











