दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित, ,जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजेच पराक्रम दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती प्रा. दीपक राऊत, शिला गिरीकुमार, स्वाती सिरसीम, रेखा तरटे, रूपाली पाटील, सविता गायकवाड, शितल निकम व विद्यार्थी उपस्थित होते
. यावेळी विद्यार्थ्यांनी नेताजींच्या कर्तुत्वाचा लेखाजोखा मांडला.नेताजी सुभाष चंद्र बोस म्हणजेच धैर्य, पराक्रम ,आणि निर्भय नेतृत्व ,स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाचा स्पष्ट मार्ग दाखवणारे महान क्रांतिकारक” तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा” हा त्यांचा अमरसंदेश होता .आझाद हिंद सेनेच्या स्थापनेतून त्यांनी स्वाभिमान जागवला .नेताजींचे जीवन आत्मसन्मान आणि त्यागाचे प्रतीक आहे. पराक्रम म्हणजे, संकटातही ध्येयाची प्रामाणिक राहणे होय. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा देखील नेताजी देतात .युवांसाठी नेताजी म्हणजे साहस आणि नेतृत्वाचा आदर्श ,राष्ट्रहितासाठी धाडसी निर्णय घेण्याची शिकवण देणारे नेताजींचे विचार आजही देश निर्मितीस मार्गदर्शक ठरत आहेत .या कार्यक्रमाचे निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.










