मान्यवरांच्या उपस्थितीत केदार मॅडम यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न
भेंडा – प्रतिनिधी
समाजातील सर्वच घटकांना असणाऱ्या विविध समस्या सोडविणे तसेच शैक्षणिक कामाव्यतिरिक्त असणारे शिक्षकांचे इतर व्याप कमी करणे यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कुकाणा येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
शिक्षण विस्तार अधिकारी मीराबाई केदार – पालवे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात विठ्ठलराव लंघे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य भैय्यासाहेब देशमुख होते. व्यासपीठावर नागेबाबा संस्थानचे अंकुश महाराज कादे,माजी सभापती काशिनाथ नवले, कुकाणा सरपंच लताताई अभंग,विस्तार अधिकारी रुकसाना शेख,शिक्षक बँकेचे संचालक रामेश्वर चोपडे,रमेश गोरे,राजु मुंगसे, पांडुरंग काळे, नामदेव ऊंडे, शिक्षक संघटनेचे नेते बापूसाहेब तांबे,राजेंद्र ढोले, केंद्र प्रमुख कडू पाटील , पत्रकार कारभारी ग्रँड, केंद्र प्रमुख कमल लाटे,विषय तज्ञ मोहंमद समीर शेख , नामदेव शिरसाठ सर,सुरेश सानप,आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी देवगड संस्थानचे प्रकाशानंदगिरी महाराजांनी सेवापूर्ती बद्दल मीराबाई केदार यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षण आणि संस्कार असतील तर कोणतीही व्यक्ती कुणापुढेही झुकत नाही आणि कधीही खाली पडत नाही. आपल्या सेवेच्या कालावधीत मीराबाई यांनी मूल्य अधिष्ठित योगदान देऊन शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे काम केले,असे कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख म्हणाले.
सेवेच्या कालावधीत नियम व शिस्त पाळून विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत राहिले. त्याचेच परिपूर्ण फळ फळ मिळाले असून पूर्ण समाधानी असल्याचे सत्काराला उत्तर देताना मीराबाई म्हणाल्या. 
काशिनाथ नवले,रामचंद्र गजभार, रामेश्वर चोपडे, राजू मुंगसे, शकील खान,पांडुरंग काळे,हर्षदा प्रसाद गर्जे आदींनी मनोगत व्यक्त करून मिराबाई केदार यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास भारत वाबळे,पावलस गोर्डे, यशवंत एरंडे, किशोर मिसाळ, भरत कांडेकर, चंद्रकांत आघाव, साहेबराव मले, प्रदीप चक्रनारायण, लखन गरड,अक्षय शिंदे, सोहम भोले,दुर्योधन सोनवणे,अजित भोगे,धोंडीराम शिंदे ,अल्ताफ बागवान,,इस्माईल शेख,रज्जाक इनामदार,संदीप फ़ुलारी, पोपट घुले, विस्तार अधिकारी गाडेकर, शिक्षक नेते राजेंद्र ढोले, विलास लवांडे, केंद्र प्रमुख विष्णू गायकवाड,रघू लबडे, संजय पालवे, केशव पालवे आदींसह नेवासा व शेवगाव तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक शिक्षक सहकारी बँक व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश शेलार यांनी प्रास्ताविकातून मिराबाई यांचे शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला,अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन व सुधाकर पालवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.










