14.3 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

spot_img

रांजणगावदेवी येथे आज ठिकठिकाणी जिजाऊ माता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

. रांजणगावदेवी( प्रतिनिधी) आज जिजाऊ माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रांजणगाव ग्रामस्थांच्या वतीने व ह भ प बंन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने ठिकठिकाणी साजरी करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक श्री आरेकर सर हे होते प्रतिमा पूजन दानियल जावळे व सौ शकुंतला काळे मॅडम यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भाऊसाहेब अकोलकर सर, श्री गडाख सर आरगडे सर सरोदे सर, पेहेरे सर श्री अशोक पंडीत विठ्ठल होले सर, म्हसे सर काशिनाथ गवते ग्रामस्थ बबन अल्हाट बाबासाहेब जावळे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली मुख्याध्यापक श्री बाळासाहेब पंडीत सर यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले व मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी भाषणेही झालीत.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाच्या जनक मानल्या जातात. समाजात स्त्रिया व दलितांना शिक्षण नाकारले जात असताना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शिक्षण देताना त्यांना समाजाकडून अपमान, दगडफेक व बहिष्कार सहन करावा लागला; तरीही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही.
सावित्रीबाई फुले यांनी विधवांसाठी आश्रम सुरू केले, बालहत्या प्रतिबंधासाठी कार्य केले आणि अस्पृश्यता व अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला. १८९७ मध्ये प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले. त्यांचे जीवन हे धैर्य, समता आणि मानवतेचे प्रतीक असून आजही ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. काळे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले

Related Articles

ताज्या बातम्या