14.7 C
New York
Tuesday, May 12, 2026

Buy now

spot_img

जिजामाता पब्लिक स्कूल मध्येजिजामाता पब्लिक स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावित्रीबाई फुले जयंती साजरी

दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
” विद्या विना मती गेली, मती विना निती गेली, नितीविना गती गेली, गतिविधी शूद्र खचले, इतके सगळे अनर्थ हे एका अविद्येने केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. व पहिल्या शिक्षिका होण्याचा बहुमान मिळवला.

या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती उपप्राचार्य प्रा. दीपक राऊत, शिला गिरीकुमार ,कोमल ठाणगे व विद्यार्थी उपस्थित होते. कु. क्षितिजा घुले या विद्यार्थिनीं ने सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करून त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक सचिन गावडे यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा लेखाजोखा मांडून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओवी खरड व समीक्षा गरड यांनी केले तर उपप्राचार्य प्रा.दीपक राऊत यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या