दै.नगरशाही शेवगाव प्रतिनिधी/ समीर शेख-
*विज्ञान गणित प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांची चिकित्सा जागृत होण्यासाठी विज्ञान ,गणित ,पर्यावरण प्रदर्शन आयोजन महत्त्वाचे आहे, त्या माध्यमातून भावी पिढीला अनुभवातून शिकलेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहण्यास मदत होते , तसेच विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना येण्यास चालना मिळते असे प्रतिपादन संकुलाचे मुख्य प्रशासक आद. श्री. सचिनराव कर्डिले सर यांनी केले.
शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक व क्रीडा संकुल ढोरजळगाव ने येथे आज दिनांक 27 डिसेंबर तालुका स्तरीय प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणून शालेय अंतर्गत गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सहभाग नोंदवून आपल्या उपकरणाचे सादरीकरण केले.

सदरील कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्य प्रशासक आदरणीय श्री सचिनराव कर्डिले सर, विकास अधिकारी आद.श्री. आनंदराव घाडगे, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आद.श्री. आशिष भारती सर, मुख्याध्यापिका श्रीमती संगीता झिंजुर्डे मॅडम,त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य आद.श्री संजय बुधवंत सर, सीनियर कॉलेजचे प्रा.संदीप घोडेचोर सर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आद.श्री.विनोद भोईटे सर, फलके सर तसेच विज्ञान गणित प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व मार्गदर्शक शिक्षक व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व बालसैनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आकाश मिसाळ यांनी केले तर सर्वांचे आभार आद. श्री.अशोकराव गाडे सर यांनी मानले .
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित, शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील शैक्षणिक व क्रीडा संकुल, ढोरजळगाव येथे आज तालुका स्तरीय प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शालेय स्तरावर अंतर्गत गणित व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध नाविन्यपूर्ण गणितीय व वैज्ञानिक उपकरणांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधन वृत्तीला आणि सृजनशीलतेला या प्रदर्शनातून योग्य व्यासपीठ मिळाले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.










