शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर… शिक्षकांच्या आंदोलनांमुळे 20% टप्पावाढ मिळणार का ?
दै.नगरशाही
मुंबई विशेष प्रतिनिधी/ शकुर शेख
मुंबई येथील ऐतिहासिक आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे 22 जून पासून राज्यव्यापी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोचलेले आहे.आज बुधवार दि.8 रोजी हजारो शिक्षक टप्पा वाढ, जुनी पेन्शन योजना, त्रुटी पात्र शाळा, निवृत्ती वयोमर्यादा 60 वर्षे आदि मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे.
मा श्री खा शरदचंद्र पवार ,. राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांची शिक्षक समन्वय संघाच्या टीमने सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी आमदार श्री रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून भेट घेतली. सदरील भेटीदरम्यान आज आझाद मैदानावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिक्षकांबाबत व त्यांच्या प्रमुख प्रश्नांबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. आज मिळालेल्या माहितीनुसार स्वतः पवार साहेब शिक्षकांच्या प्रश्नासाठी मैदानावर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु जर उद्या पावसाचे वातावरण असल्यास सदरील प्रश्न बाबत स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत भेटी घेऊन हे विषय कायमचे मार्गे लागावे, या प्रश्नांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये,याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे सागितले..
यावेळी आमदार रोहितदादा पवार, खंडेराव जगदाळे सर ज्ञानेश चव्हाण सर ,अनिल परदेशी ,संतोष वाघ ,शिवराम म्हस्के , संजय डावरे, कर्ततारसिंग ठाकूर ,प्रा.अमरसिंह खांडेकर येरेकर सर अंकुश शेंडोकार ,भूपेंद्र पाटील सर,रहाटे काका इत्यादी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक उपस्थित होते.
आमदार ज.मो.अभ्यंकर व आमदार लाड यांनी आझाद मैदानावर शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

आमदार रोहीत दादा पवार , आमदार जयंत आसगावकर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री किरण सरनाईक , मंत्री गिरीश महाजन आंदोलनाला भेट दिली. शिक्षक आमदार किशोर दराडे, नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे, पदवीधर आमदार सत्यजित तांबे,मा . आ.श्रीकांत देशपांडे ,शिक्षकनेत्या शुभांगी ताई पाटील आदिंची शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलन व इतर मागण्यांवर लवकर निर्णय घेण्यासाठी भेट घेऊन निवेदन दिले.

आंदोलनासाठी कोल्हापूर,अहिल्यानगर, संभाजीनगर ,कोकण, मुंबई सह राज्यातील शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत.
मुंबई आझाद मैदानावर अनुदानासाठी भर पावसात, मुख्याध्यापक राजेंद्र जाधव शिक्षक समन्वयक प्रा. शकुर शेख, मुख्याध्यापक सुदर्शन इंग्लिश स्कूल पिचडगाव आणि कुकाणा उच्च माध्यमिक विद्यालयाचे ता.नेवासा प्रा.संदिप वाबळे व प्रा.अक्षयभैय्या भुसारी व जिजामाता ज्युनिअर कॉलेज, भेंडे बु ता . नेवासा,प्रा.संदिप दाभाडे, प्रा.शेखर आव्हाड,प्रा.केदारनाथ आगळे,प्रा.राजेभोसले,गोंडेगाव विद्यालयाचे,प्रा.उमेश मुंडे,प्रा.गोरख नवले,प्रा.सागर बनसोडे, आदिंसह राज्यभरातील शिक्षक, महिला भगिनी उपस्थित आहेत.
आत्तापर्यंत भाजप सह मित्र पक्ष सरकारने 20%,40%,60%,80%अनुदान दिले आहे.पुढील 20% टप्पा वाढीकडे हजारों शिक्षकांचे लक्ष लागले आहे.स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील अनुदानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनुदानाचा योग्य निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय देतील.शिक्षकांचे 20 वर्षांपासूनचा वनवास संपेल.










