त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज मानांकनात अव्वल
दै.नगरशाही नेवासा फाटा (दि.०६ जुलै): येथील त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेजने (खडके) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) द्वितीय संस्था अवेक्षण अहवालात उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत ‘Good’ (उत्कृष्ट) मानांकन पटकावले आहे.
हा देदीप्यमान विजय संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगेपाटील यांच्या दूरदर्शी संकल्पनेचा परिपाक आहे. त्यांचाच विचारांचा वारसा पुढे चालवत, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगेपाटील व उपाध्यक्षा ॲड. स्नेहल घाडगेपाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेने यशाचे हे शिखर सर केले आहे. या प्रवासात संस्थेच्या सहसचिव डॉ. श्रुती आमलेपाटील यांचे अविरत प्रोत्साहन मोलाचे ठरले.
हे मानांकन मिळवण्यात प्रशासकीय समन्वयक डॉ. अनुराधा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्रा. अभिजीत रोडे, प्रा. अर्चना शेरे, प्रा. कृष्णा डमाळे, प्रा. सागर सोलाट यांच्यासह डिप्लोमा फार्मसीच्या सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेली अपार मेहनत अत्यंत महत्त्वाची ठरली. या यशाबद्दल सर्व स्तरातून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे. एमएसबीटीई (MSBTE) च्या या उत्कृष्ट मानांकनामुळे चालू शैक्षणिक वर्षाच्या डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी दर्जेदार शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची या महाविद्यालयाला पहिली पसंती मिळत आहे.










