शिक्षणमहर्षी साहेबराव गाडगे पाटील यांचे पुण्यस्मरण सामाजिक उपक्रमाने साजरा
दै.नगरशाही प्रतिनिधी नेवासे / समीर शेख –
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक, शिक्षणमहर्षी स्वर्गीय साहेबराव घाडगेपाटील (आबा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तेलकुडगाव (ता. नेवासे) येथील ‘त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल’ येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात हा पुण्यस्मरण सोहळा व कीर्तन सेवा कार्यक्रम संपन्न झाला.
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमतीताई साहेबराव घाडगेपाटील आणि घाडगेपाटील परिवाराच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे सुनियोजित आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत या सोहळ्याचे औचित्य साधून अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे घाडगेपाटील परिवाराच्या वतीने परिसरातील जवळपास १००० कुटुंबांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक झाले.
राष्ट्रीय खेळाडूंचा रोख रक्कम देऊन गौरव
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी या सोहळ्यात राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वैष्णवी काळे ला २१,०००/- व आंतरराष्ट्रीय खेळाडू वेदांत वाघमारे यास १,००,०००/-रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हा गौरव त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्षा स्नेहल चव्हाणपाटील, सहसचिव डॉ. श्रुती आमलेपाटील, संस्थेचे विश्वस्त चेतन चव्हाणपाटील आणि डॉ. गौरव आमलेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने आमदार विठ्ठलराव लंघे,सुनिताताई गडाख,प्रभाकरजी शिंदे,ॲड. देसाईआबा देशमुख,मश्चिंद्रपाटील म्हस्के,पितांबर चव्हाण, डॉ. राजेंद्र आमले, शिवाजीराव पवार, नानासाहेब फाटके,ज्ञानेश्वर महाराज तांबे, करणसिंह घुले,ॲड. एम. आय. पठाण,लक्ष्मणराव नाकाडे, गणेश कराड, महादेव कराड, बापूसाहेब पाटेकर,उकीर्डे सर,गोरक्षनाथ घोडेचोर, रामदासजी गोल्हार,प्रशासक सचिन कर्डिले, प्राचार्य भोईटे सर, प्राचार्य चोळके सर,आशिष भारती,संतोष जावळे,प्रशासक मनिषा राऊत, प्राचार्य सोपान काळे, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, प्रा भाऊसाहेब गाढवे,प्रा दत्तात्रय वांढेकर ,हभप अमोल महाराज,हभप सुनिलगिरी महाराज,
रेवणनाथ काळे पाटील,सतिश राव काळे पाटील,दयाघन गटकळ पाटील,अरुण घाडगे पाटील,बाबुराव काळे आमदार, नामदेव अण्णा घोडेचोर पाटील,ज्ञानेश्वर काळे पाटील,काकासाहेब काळे पाटील, भानुदास गटकळ पाटील,महेश राजे काळे पाटील,सुधाकर राजहंस दादा,दीपक तात्या घाडगे पाटील,अरविंद भाऊ घाडगे पाटील,सुरेश काळे साहेब,बालकनाथ काळे पाटील,ॲड सचिन घोडेचोर पाटील, बाळासाहेब कराड, अनंता उकिर्डे, देविदास पाटेकर,सुरेश पाटेकर साहेब,दादासाहेब घाडगे, शरदराव तात्यासाहेब घाडगे, अनंता उकिर्डे, पाटेकर साहेब, निलेश कोकरे, हभप सुनिल गिरी महाराज, जोंधळे महाराज, डॉ. नजन, ताके पाटील,हभप श्रीधर घाडगे महाराज,हभप नामदेव महाराज घाडगे,हभप अमोल महाराज घाडगे,हभप महेश महाराज घाडगे, प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य सोपानराव काळे,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे,दत्तात्रय वांढेकर, भाऊसाहेब गाढवे,शिवाजीराव काटे,बाळासाहेब कोकरे,नामदेव ताके,पत्रकार सुधीर चव्हाण,शाम मापारी,चंद्रकांत दरंदले आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी समाधान महाराज शर्मा यांची ‘कीर्तन सेवा’ आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, हितचिंतक, साहेबांवर प्रेम करणारे मित्रपरिवार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, वैद्यकीय, विधी, आदी क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, ग्रामस्थ, आणि वसतिगृहातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधानाचा आणि कृतज्ञतेचा भाव अधोरेखित करणाऱ्या ‘पसायदानाने’ या संपूर्ण सोहळ्याची अतिशय मंगलमय वातावरणात सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्रिमूर्तीच्या तेलकूडगाव, नेवासाफाटा,शेवगाव, ढोर जळगाव येथील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे संचालन अशोकराव गाढे व लक्ष्मण दळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वस्त चेतन चव्हाण यांनी मानले.











