22.5 C
New York
Tuesday, June 16, 2026

Buy now

spot_img

सुखदेव फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर*

 

भेंडा(वार्ताहर):– लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक व सीनियर डिस्टिलरी केमिस्ट सुखदेव एकनाथ फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यभरातील उद्योग क्षेत्रात नोकरी करत असतानाच उत्पादन क्षेत्राबरोबर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,आरोग्य किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व कामगार भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. प्रस्तावाची
शासनस्तरावर छाननी होऊन पात्र अर्जदारांची मुंबई येथे तोंडी मुलाखत घेवून अंतिम निवड करण्यात येते.
त्यानुसार विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व कामगार भूषण पुरस्कार

२०२४ यासाठी निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थींची यादि मंगळवार दि.१६ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचे जाहीर केली.
त्यामध्ये १ कामगार भूषण पुरस्कार व ५१ विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारार्थींचा समावेश आहे.


श्री.सुखदेव फुलारी हे १९९३ पासून
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागामध्ये केमिस्ट पदावर कार्यरत असून उत्पादन क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,आरोग्य,जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण,रक्तदान यासह इतर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत देण्यात येणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक आढळगड देसाई देशमुख, संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,जनरल मॅनेजर रवींद्र मोटे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, सचिव संभाजीराव माळवदे, उपाध्यक्ष संजय राऊत,खजिनदार आप्पासाहेब शिंदे, अण्णासाहेब गर्जे व सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी श्री. फुलारी यांचे अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या