परतीचा जोरदार पाऊस पडणार ! शेतकऱ्यांसाठी 2026 पिके जोमाने येणार
श्रीराम बायोसिडस् जेनेटिक्सचे कपाशी,मका वाण घ्यावे –
हवामान तज्ञ डॉ. पंजाबराव डक
दै.नगरशाही नेवासा प्रतिनिधी / समीर शेख- अहिल्या नगर जिल्ह्यात चालू वर्षी 600-700 मिलिमीटर बेताचा पाऊस पडणार आहे, परंतु पिके जोमाने येतील तसेच परतीचा पाऊस जोरदार पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ डॉ. पंजाबराव डक
यांनी सांगितले.बायो सिडस् व त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र भेंडे,पाथरवाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.या प्रसंगी त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात होणाऱ्या बदलांच्या आधारे , पाऊस कसा पडतो यावर भाष्य केले.
शेतकऱ्यांनी बायो सिड्स च्या कमी कालावधीत व रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या वाणांची लागवड करावी असे आवाहन उपस्थित शेतकरी बांधवांना केले.
श्रीराम बायोसिड्स जेनेटिक्स रिजनल मेनेजर भरत पोतदार यांनी संकरीत जास्त कापूस व संकरीत मका जे जास्त उत्पन्न देतात अशा पिकांच्या वाढीसाठी व शेतकरी फायद्याचे सुधारित वाण खरेदी करण्याचें आवाहन केले.
filter:
यावेळी श्रीराम बायोसिड्स जेनेटिक्स चे अहिल्यानगर मेनेजर विष्णू बटुळे, शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तरवडी सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन क्षिरसागार, डॉ. सुदाम खाटीक, माजी सरपंच रमेश खाटीक, बायो सिडस् चे विष्णु बटुळे, भरत पोतदार, डॉ. नानासाहेब थोरे प्रगतशिल शेतकरी अरूण फोलाणे,बाळासाहेब खाटीक,मा.सरपंच रमेश खाटीक, बाळासाहेब झावरे, डॉ नानासाहेब थोरे, अण्णासाहेब काटे, संदिप झिरपे, अप्पा कावरे,दै.लोकमतचे पत्रकार सुनिल पंडित, भावी निमगावचे राजेंद्र शिंदे, बाबुराव खाटीक, संजय आढाव, सोन्याबापू खाटीक आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक मा .कृ.उ.बाजार समितीचे कमिटीचे संचालक दत्तात्रय खाटीक यांनी केले.सूत्रसंचालन ईस्माइल शेख तर आभार त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र संचालक बाळासाहेब खाटीक यांनी मानले.
डॉ.पंजाबराव डख यांचा सन्मान करतांना मा सरपंच दत्तात्रय खाटीक, पत्रकार सुनिल पंडित,दै.नगरशाहीचे मुख्य संपादक अँड ईस्माइल शेख, महाराष्ट्र रिजनल मेनेजर भरत पोतदार
जयकिसान दूध संचालक अरूण फोलाणे, संजय वाघ, पानसरे पाटील डॉ.पंजाबराव डक यांचा सन्मान करतांना 🌹🎇🪴🎆