दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी एमपीएससी मार्फत नुकतीच नियुक्ती मिळालेली श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी राज्यकर सहआयुक्त पुजा शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात जिद्द सातत्य संयम ठेवून यश प्राप्त करावं असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावरती ह.भ.प. श्रीधर पुंड महाराज, पूजा शिंदे, शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे, प्रा.डॉ. राजेंद्र गवळी, प्रा. दीपक राऊत, उज्वला फटागरे, रत्नमाला खराडे उपस्थित होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी पुंड महाराज म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर संस्कार जोपासणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या व बुद्धीचा जीवावर जीवनात यश संपादन करावे. प्रा.भारत वाबळे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी संयम ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. यावेळी शिक्षक सुदीप खरात व जयश्री थोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संपूर्ण दहावीच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून विद्यार्थ्यांना भोजनाची मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व ओवी खरड व पूर्वा काळे यांनी केले तर आभार शिक्षिका उज्वला फटांगरे यांनी मानले










