नेवासाफाटा (वार्ताहर):सैन्यात सहभागी होऊन देशसेवा कशी करता येते, शिस्त, कर्तव्यनिष्ठा व त्यागातून आदर्श नागरिक कसा घडतो,याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सैनिक फेडरेशन अहिल्यानगरच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबरोबरच सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी होत असलेल्या कार्याची माहितीही त्यांनी दिली.
अशा प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित होते आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित पिढी घडते.
देश प्रथम, सेवा सर्वोच्च!तुमच्या शिक्षणासाठी आई-वडील रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचे चीज करा. कर्नल सुनील राजदेव .
त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित नेवासा फाटा येथील शैक्षणिक संकुलातील श्री.शिवछत्रपती क्रीडांगणावर 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त कर्नल सुनील राजदेव यांचेसह सेवानिवृत्त सुभेदार मेजर अरुण फाटके,शेतकरी संघटनेचे प्रदेशक्ष अंबादास कोरडे,मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य प्रवेश कक्षामध्ये प्रमुख पाहुण्यांना संस्थेच्या अध्यक्षा ॲड सुमती साहेबराव घाडगेपाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे आराध्य दैवत भगवान दतात्रय,पैसखांबाची पाहुण्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मेजर परमेश्वर कसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सैनिकी बँड पथकाने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल सुनील राजदेव, सेवानिवृत्त सुभेदार मेजर अरुण फाटके,शेतकरी संघटनेचे प्रदेशक्ष अंबादास कोरडे,मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे,अध्यक्षा सौ.सुमती घाडगेपाटील, उपाध्यक्षा सौ.स्नेहल चव्हाणपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, प्राचार्य डॉ.चांगदेव आरसुळे, प्राचार्य सोपानराव काळे, प्राचार्य अरविंद देशमुख, प्राचार्य श्रीदेवी नायर, समन्वयक डॉ.अनुराधा गोरे,वित्त व्यवस्थापक अनिता जाधव, यांसह संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, विभाग प्रमुख यांना सन्मानाने वाजत गाजत अमर जवान स्तंभाजवळ नेण्यात आले. अमर जवान स्तंभास पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल सुनील राजदेव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी संस्थेच्या बालसैनिकांनी सलामी दिली. राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्रिमूर्ती शैक्षणिक संस्था ही खूप मोठे योगदान देत आहे. दरवर्षी अनेक सैनिक अधिकारी या संस्थेने घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असे गौरवोद्गार यावेळी कर्नल राजदेव यांनी काढले. यावेळी त्यांनी परेड केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्रिमूर्ती ही सैनिक बनवणारी संस्था आहे. तुमच्या शिक्षणासाठी आई-वडील रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचे चीज करा. त्रिमूर्ती मधील शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करा. उत्तुंग होऊन तुमच्या माध्यमातून समाजाला न्याय द्या असे आवाहन यावेळी त्रिमूर्तीच्या अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगेपाटील यांनी केले.
यावेळी सुमारे ७०० विद्यार्थी व १२ अश्वांचे अश्वदल संचलनामध्ये सहभागी झाले होते. लढाऊ विमान व रणगाड्याच्या भल्या मोठ्या प्रतिकृतींची मिरवणूक यावेळी परेड मध्ये सहभागी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी केलेली परेड आणि भाषणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमप्रसंगी देशप्रेमाने भारावलेली,शिवकालीन चित्तथरारक प्रात्यक्षिके त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय व त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी विविध खेळात विशेष प्राविण्य मिळविलेल्या राज्य व राष्ट्रीय खेळाडू व विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व संस्थेचे ॲड सुमती साहेबराव घाडगेपाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगेपाटील, उपाध्यक्षा ॲड. सौ स्नेहल चव्हाणपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, विश्वस्त,विश्वस्त सौ अनिता गाढवे पाटील,महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. अनुराधा गोरे, प्राचार्य डॉ. सी. एस. आरसुळे, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्रीदेवी नायर, पर्यवेक्षक संजयसिंह चौहाण, वित्त व्यवस्थापक सौ.अनिता जाधव, सरपंच परवेज पठाण यांसह सर्व विभागाचे विभागप्रमुख, सर्व क्रीडा शिक्षक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेल व ओघवत्या शैलीतील पालकांना खिळवून ठेवणारे सूत्रसंचालन प्राचार्य अरविंद देशमुख,प्रा. लक्ष्मण दळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सोपान काळे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. पावन प्रतिष्ठान संचलित नेवासा फाटा येथील शैक्षणिक संकुलातील श्री.शिवछत्रपती क्रीडांगणावर 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त कर्नल सुनील राजदेव यांचेसह सेवानिवृत्त सुभेदार मेजर अरुण फाटके,शेतकरी संघटनेचे प्रदेशक्ष अंबादास कोरडे,मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य प्रवेश कक्षामध्ये प्रमुख पाहुण्यांना संस्थेच्या अध्यक्षा ॲड सुमती साहेबराव घाडगेपाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे आराध्य दैवत भगवान दतात्रय,पैसखांबाची पाहुण्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मेजर परमेश्वर कसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सैनिकी बँड पथकाने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल सुनील राजदेव, सेवानिवृत्त सुभेदार मेजर अरुण फाटके,शेतकरी संघटनेचे प्रदेशक्ष अंबादास कोरडे,मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे,अध्यक्षा सौ.सुमती घाडगेपाटील, उपाध्यक्षा सौ.स्नेहल चव्हाणपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, प्राचार्य डॉ.चांगदेव आरसुळे, प्राचार्य सोपानराव काळे, प्राचार्य अरविंद देशमुख, प्राचार्य श्रीदेवी नायर, समन्वयक डॉ.अनुराधा गोरे,वित्त व्यवस्थापक अनिता जाधव, यांसह संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, विभाग प्रमुख यांना सन्मानाने वाजत गाजत अमर जवान स्तंभाजवळ नेण्यात आले. अमर जवान स्तंभास पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल सुनील राजदेव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी संस्थेच्या बालसैनिकांनी सलामी दिली. राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्रिमूर्ती शैक्षणिक संस्था ही खूप मोठे योगदान देत आहे. दरवर्षी अनेक सैनिक अधिकारी या संस्थेने घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असे गौरवोद्गार यावेळी कर्नल राजदेव यांनी काढले. यावेळी त्यांनी परेड केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्रिमूर्ती ही सैनिक बनवणारी संस्था आहे. तुमच्या शिक्षणासाठी आई-वडील रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचे चीज करा. त्रिमूर्ती मधील शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करा. उत्तुंग होऊन तुमच्या माध्यमातून समाजाला न्याय द्या असे आवाहन यावेळी त्रिमूर्तीच्या अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगेपाटील यांनी केले.
यावेळी सुमारे ७०० विद्यार्थी व १२ अश्वांचे अश्वदल संचलनामध्ये सहभागी झाले होते. लढाऊ विमान व रणगाड्याच्या भल्या मोठ्या प्रतिकृतींची मिरवणूक यावेळी परेड मध्ये सहभागी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी केलेली परेड आणि भाषणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमप्रसंगी देशप्रेमाने भारावलेली,शिवकालीन चित्तथरारक प्रात्यक्षिके त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय व त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी विविध खेळात विशेष प्राविण्य मिळविलेल्या राज्य व राष्ट्रीय खेळाडू व विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व संस्थेचे ॲड सुमती साहेबराव घाडगेपाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगेपाटील, उपाध्यक्षा ॲड. सौ स्नेहल चव्हाणपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, विश्वस्त,विश्वस्त सौ अनिता गाढवे पाटील,महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. अनुराधा गोरे, प्राचार्य डॉ. सी. एस. आरसुळे, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्रीदेवी नायर, पर्यवेक्षक संजयसिंह चौहाण, वित्त व्यवस्थापक सौ.अनिता जाधव, सरपंच परवेज पठाण यांसह सर्व विभागाचे विभागप्रमुख, सर्व क्रीडा शिक्षक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेल व ओघवत्या शैलीतील पालकांना खिळवून ठेवणारे सूत्रसंचालन प्राचार्य अरविंद देशमुख,प्रा. लक्ष्मण दळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सोपान काळे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली.