नेवासा प्रतिनिधी: समीर शेख
नेवासा तालुक्यातील तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त अण्णा पाटील घाडगे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर विश्वस्त दादासाहेब घाडगे, लक्ष्मणराव काळे,मच्छिंद्र म्हस्के, अरुण पाटील घाडगे,सतिष काळे,शरद काळे,बाबुराव काळे,शिवाजी घोडेचोर, सुरेश काळे,हरिश्चंद्र काळे,नामदेव अण्णा घोडेचोर,काकासाहेब काळे,महेश काळे, अशोक काळे,बालकनाथ काळे,सुरेश काळे, भानुदास गटकळ, तुळशीराम काळे, काकासाहेब काळे, काकासाहेब घोडेचोर, अमोल महाराज घाडगे, नामदेव महाराज घाडगे,भाऊसाहेब शेंडगे, सखाराम काळे,अशोक गोविंद काळे, पोपटराव सरोदे बाळासाहेब घोडेचोर बापूराव साळवे, संजय घोडचोर, भाऊसाहेब शेंडगे, सोपान शेंडगे,बंडू घोडेचोर,अनिल राजहंस,विद्यालयाच्या प्रशासिका मनिषा राऊत, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, तसेच वसतीगृहातील पालक,ग्रामस्थ आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभात फेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर बालसैनिकांनी राष्ट्रध्वजाला परेड संचलनाद्वारे मानवंदना दिली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.नंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यालयातील-विविध स्पर्धेतील गुणवंत-यशवंत,विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शासनादेशाप्रमाणे सर्व उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक अभियानांतर्गत शपथ देण्यात आली.यावेळी विद्यालयाच्या प्रशासिका मनिषा राऊत यांच्याकडून उत्कृष्ट परेड संचालन केलेल्या बाल सैनिकांच्या गृपला रोख स्वरूपात बक्षिस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले विद्यार्थी व शिक्षक मनोगतानंतर खाऊ-वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.नानासाहेब बांदल व गणेश काळे यांनी केले तर प्रास्ताविक समीर शेख यांनी केले,आभार विद्यालयाचे विभाग प्रमुख अतुल कराड यांनी मानले.










